Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

नवे SP अरविंद साळवे (IPS) यांनी चंद्रपूर जिल्ह्याचा स्वीकारला पदभार New Superintendent of Police Chandrapur




चंद्रपुर जिल्हा पोलीस दलाचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक मा. श्री. अरविंद साळवे, भापोसे यांनी दिनांक 19-09-2020 रोजी मध्यान्हांनंतर आपले पदाचा कार्यभार स्विकारला.



🔰 पोलीस अधीक्षक आहेत मेकॅनिकल इंजिनियर :

मुळचे वैदर्भीय असलेले अरविंद साळवे यांचे बालपण आणि शिक्षण वडीलांच्या नोकरीमुळे औरंगाबाद शहरात झाले. औरंगाबादच्या शासकीय अभियांत्रीकी महाविद्यालयातून त्यांनी मेकॅनिकल इंजिनियरमधून पदवी घेतली आहे.



🔰त्यानंतर राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून पोलीस उपअधीक्षक म्हणून नियुक्त झाले. त्यांची सर्वप्रथम नियुक्ती वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून झाली.



🔰त्यानंतर त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील वडसा, देसाईगंज आणि भंडारा येथे 1999 मध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून कार्य केले.





🔰 2008 साली अमरावतीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून काम सांभाळल्यानंतर अमरावतीतच लाल लुचपत प्रतिबंधक खात्याचे पोलीस अधीक्षक झाले.





🔰 त्यानंतर नवी मुंबई वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त म्हणून पदभार सांभाळला. भंडारा येथे येण्यापूर्वी ते मुंबई येथे राज्य विद्युत वितरण कंपनीचे सुरक्षा व अंमलबजावणी पोलीस अधीक्षक होते. राज्यातील वीज चोरी थांबविण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याची प्रशंसा झाली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies