नदीत बुडून बेपत्ता झालेल्या शिवमचा मृतदेह अखेर सापडला Shivam's body was finally found after drowning in the river
मुल:- मुल येथील व्यवसायी प्रकाश सावरकर यांचा मुलगा शिवम सावरकर (१८ वर्षे) हा उमा नदीच्या कोसंबी घाटावर पोहण्यासाठी गेला असता नदीत बुडाल्याची विश्वसनिय माहीती आहे. स्थानिक नव भारत विद्यालयाचे पटांगणावर क्रिकेट खेळुन झाल्यानंतर सकाळी ८ ते ९ च्या दरम्यान शिवम सहा मिञांसोबत कोसंबी घाटावर पोहायला गेला होता. पोहतांना निंबाळकर नामक मिञ पाण्यातील खोल खड्ड्यात बुडत असल्याचे लक्षात येताच काही मिञ त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत होते.


दरम्यान शिवम सावरकर हा त्यांच्या मदतीला जात असतानाच तो खोल पाण्याच्या प्रवाहात बुडाला. निंबाळकर नामक मिञाला पाण्याबाहेर काढण्यात यश आले परंतु शिवम सावरकर याला बाहेर काढता आले नाही.

सदर घटनेची माहीती होताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाली. नदी पाञात रेती उत्खनना सोबतच नवीन पुलाचे बांधकाम सुरू असल्याने मोठे खड्डे पडले आहेत, पाणी सुध्दा भरपुर असुन प्रवाह वेगात आहे. मूल पोलिस स्टेशन व तहसिल कार्यालयाच्या माध्यमातून चंद्रपूर येथील जिल्हा आपत्ती व्यवस्थापण येथून बोट बोलवण्यात आली परंतु काल रात्र झाल्यमूळे त्यांना पण मृतदेह सापडला अपयश आले.

नंतर आज सकाळी 7:30 वाजता शिवम चे बाबा, काका, मोठे बाबा, सर्व घरचे मंडळी नदीकाठावर गेले असता. तेव्हा 24 तासानंतर शिवम चा मृतदेह ज्या ठिकाणी बुळाला त्याच्या विरुद्ध दिशेने त्याचा मृतदेह तरंगत दिसला. तेव्हा पोहण्यात तरबेज (ढिवर) बांधवाच्या साहाय्याने त्याचा मृतदेह बाहेर काढले. घटनेस्थळी पोलिस दाखल झाले.व मूल उपजिल्हा रुग्णालय मधे शवविच्छेदनासाठी मृतदेह नेण्यात आले असून, शवविच्छेदनानंतर शिवमचा मृतदेह घरच्यांच्या हातात देणार आहे.

Post a comment

0 Comments