प्राप्त माहितीनुसार मृतक दिनेश काळे हा रामदेवबाबा साल्वंट येथे सेक्युरिटी गार्ड असून याचा रोजच्या वेळेप्रमाणे रात्रौ 7 वाजता आपल्या ड्युटीवर जात असतांना रात्री 7 ते 7.30 दरम्यान आपल्या यामाहा एमएच 31 डी जे 4517 क्रमांकाच्या दुचाकीने ड्युटीवर जात असतांना 7 ते 7.30 दरम्यान आरमोरी मार्गे भरधाव वेगाने चारचाकी वाहनाने दिनेश काळे याला पाठीमागेऊन जबर धडक दिली व मुख्य रस्त्यावर जाउन पलटी मारली.
या धडकेमध्ये दिनेश काळे यास डोक्याला गंभीर जखम झाल्याने त्याला खासगी वाहनाने ब्रम्हपुरी येथील ग्रामीण रूग्णालय ब्रम्हपूरी येथे भरती करण्यात आले असता डाॅक्टरांनी तपासणी करून त्यास मृत घोषीत केले.
दिनेश च्या अपघाती मृत्यूने ब्रम्हपुरी येथे हळहळ व्यक्त केल्या जात असून त्याच्या पच्छात पत्नी,मुलगा असा बराचा मोठा आप्त परिवार आहे. घटनेचा अधिक तपास ब्रम्हपुरी पोलिस उप निरीक्षक अश्विन खेडीकर इतर पोलीस करीत आहे.