सार्वजनिक वाचनालय(अभ्यासिका) तात्काळ सुरू करा -मनविसे जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे यांची मागणी
संपूर्ण महाराष्ट्रात कोविड-19 मुळे अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.या भयानव रोगाचा परिणाम म्हणून संपूर्ण भारतात टाळेबंदी करण्यात आली.यामुळे कित्येक मजूर,व्यवसाय,छोटे-मोठे व्यावसायिक यांचे अथोनाथ नुकसान झाले.शाळा,महाविद्यालय सुद्धा बंद करण्यात आले.यासोबतच सार्वजनिक वाचनालय सुद्धा बंद करण्यात आली.
 वाचनालय बंद झाल्यामुळे स्पर्धा परीक्षा संबंधी तयारी करणाऱ्या कित्येक विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले.
    ग्रामीण भागातील मुले-मूली मोठ्या प्रमाणात  वाचनालयाच्या माध्यमातून परीक्षा उत्तीर्ण होऊन मोठ्या हुद्यावर कार्यरत आहे.
    येत्या काही दिवसात राज्यात पोलिस,रैल्वे,बैंक या खात्यात जंबो भरती करण्यासंदर्भात निदरर्शनात आले.यावेळी परीक्षेची पूर्वतयारी म्हणून वाचनालयाची भूमिका महत्वाची असते.जर वाचनालय सुरु झाले तर,विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात आधार होईल.
    आता सर्वत्र टाळेबंदी उठवण्यात येत आहे.सार्वजनिक वाहतूक व्यवस्था,होटल,लॉज,दुकाने,शासकीय कार्यालय सुरु करण्यात आले.त्याच प्रकारे वाचनालयाला सुद्धा परवानगी  कोरोना संबंधित शासनाने जाहिर केलेले सर्व नियम,दिशानिर्देशांचे पालन करून देण्यात यावी या आशयाचे निवेदन मा. जिल्हा अधिकारी साहेब,मा.पालकमंत्री विजयभाऊ वड्डेटीवार,मा.किशोर भाऊ जोरगेवार आमदार चंद्रपुर मा. जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरनुले,मा. महापौर राखी ताई कंचलावार यांना मनसे  जिल्हाप्रमुख दिलीपभाऊ रामेडवार, मनविसे जिल्हाध्यक्ष राहुलभाऊ बालमवार यांच्या मार्गदर्शनात मनविसे जिल्हा उपाध्यक्ष  कुलदीप चंदनखेडे यांच्या नेतृत्वात देण्यात आले.
सदर निवेदन देतांना जिल्हा सचिव किशोर मडगूलवार,तालुका अध्यक्ष प्रकाश नागरकर,मनविसे तालुका अध्यक्ष विवेक धोटे,मनविसे तालुका उपाध्यक्ष प्रवीण शेवते, रुग्ण मित्र कृष्णा गुप्ता,चैतन्य सादफले,यांची प्रामुख्याने उपस्थिती होती...

Post a comment

0 Comments