जनता कर्फ्यूच्या पहिल्याच दिवशी वंचित बहुजन आघाडीचा निषेध मोर्चा
कोरोना काळातील प्रशासनाचे नियोजन फसले

अपयश झाकण्यासाठी जनतेवर लादण्यात आलेला जनता कर्फ्यु

चंद्रपूर – देशात, राज्यात व जिल्ह्यात कोरोनाचा प्रादूर्भावाने लॉकडाऊन, जनता कर्फ्युने सामान्य जनतेचे मात्र कंबरडे मोडले आहे.
हाताला काम नाही, बेरोजगारीचे प्रमाण वाढले, ज्यावेळी एकही बाधित जिल्ह्यात नव्हता त्यावेळी मात्र कडक लॉकडाऊन करण्यात मात्र प्रशासनाने नियोजन केलेले नाही, त्याचा फटका आज सर्व सामान्य जनता भोगत आहे.


या परिस्थिती विरोधात वंचित बहुजन आघाडीने जनता कर्फ्युच्या पहिल्याच दिवशी आंदोलन छेडून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.


कामगार वर्गानी खायचे काय, हा प्रश्न विचारीत वंचित बहुजन आघाडीने प्रशासनाचा निषेध नोंदविला.
चंद्रपूर मनपा, जिल्हा प्रशासन कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला असताना सुद्धा नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या नाही, वेळ गेल्यावर आम्ही 1000 बेड ची व्यवस्था करू असे सांगत आहे.
जिल्ह्यातील मृतकांच्या आकड्यानी शंभरी गाठली, तरी सुद्धा प्रशासन जागे झाले नाही.
जनता कर्फ्युने काय साध्य होणार आहे, प्रशासन आपलं अपयश लपविण्यासाठी जनता कर्फ्यु नागरिकांवर लादून राहिले असा आरोप यावेळी करण्यात आला.
या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव कुशल मेश्राम, जिल्हा महासचिव जयदीप खोब्रागडे, धीरज बांबोडे, बंडू ठेंगरे, रुपचंद निमगडे, आदि उपस्थित होते.
आंदोलकांना शहर पोलिसांनी अटक करून सुटका केली.

Post a comment

0 Comments