17 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर पर्यंत विविध उपक्रमाचे नियोजन
गोरगरीब जनतेची सेवा करून विचारप्रवर्तक पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा : देवराव भोंगळे
(घुगुस प्रतिनिधी :- पंकज रामटेके)
घुग्घुस :- येथील मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राच्या वतिने पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा ७० वा वाढदिवस सेवा सप्ताह म्हणून प्रयास सभागॄहात भाजपा जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराव दादा भोंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला. येत्या सलग 25 सप्टेंबर पर्यंत सेवा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.
यावेळी ७० लाभार्थांना मोफत नविन शिधापत्रीका वाटप, ७० लाभार्थांना मोफत नविन जन-धन खात्याचे पासबुक वाटप, ७० जेष्ठ नागरीकांना सॅनिटाईजर मास्क व औषधी वाटप, ७० गोरगरीब गरजुंना धान्यकिट वाटप, ७० नागरीकांना मोफत ब्लॅकेट वाटप, ७० बचत गटांचा कर्ज मेळावा, ७० कोरोना योद्ध्यांचा सत्कार असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
आज सेवा सप्ताहाची सुरुवात 70 लाभार्थ्यांना नवीन राशन कार्ड वाटप करून व 70 लाभार्थ्यांना नवीन जनधन खात्याचे पासबुक वाटप करून करण्यात आली
याप्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले की भारताच्या नवनिर्माणासाठी प्रयत्नशील पारदर्शक प्रशासक आत्मनिर्भर भारताचे प्रणेते, गोरगरीब जनतेची सेवा करून विचारप्रवर्तक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 70 वा वाढदिवस सेवा सप्ताह म्हणून आम्ही साजरा करत आहोत. गोरगरिबांची सेवा अहोरात्र मदत करणारे घुगुस मधील मा. आ. सुधीर भाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राच्या माध्यमातून 25 तारखेपर्यंत विविध उपक्रम आम्ही राबवणार आहोत. गोरगरिबांची सेवा व्हावी हा यामागील उद्देश आहे. ईश्वर चरणी प्रार्थना करतो की माता महाकाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशसेवेसाठी उदंड आयुष्य देवो.
याप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष विवेक बोढे यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.
उपस्थितांना लाडू वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
यावेळी मंचावर जिल्हा परिषद सभापती सौ. नीतूताई चौधरी, पंचायत समितीचे उपसभापती निरीक्षण तांड्रा, माजी सरपंच राजकुमार गोडसेलवार, ग्रामपंचायत सदस्य श्रीनिवास इसाराप, विनोद चौधरी, नितीन काळे, पंकज रामटेके, सुरेंद्र भोंगळे, अमोल थेरे, अजगर खान, विनोद जंजरला, कोमल ठाकरे, अफरोज खान, आतिश मेळावार, सखी मंचच्या अध्यक्षा किरण बोढे, निशाताई उरकुडे, तरुण गणफाडे, आशिष दातारकर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य साजन गोहने तसेच आभार सुचीताताई लुटे यांनी मानले.