Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

शेतात उगवणारे मशरूम खाल्याने दहा जणांना विषबाधा Poisoning of ten people by eating mushrooms growing in the field
सावली : शेतात उगवणारे मशरूम खाल्याने दहा जणांना विषबाधा झाल्याची घटना सावली तालुक्यातील रुद्रपुर येते घडली.

समीर भोयर (२२), शुभम भोयर (२०), प्रणोती भोयर (१७), चंद्रकला भोयर (३४), तेजस्विनी कुकुडकर (१३), दुर्गा कुकुडकर (११), सानिका कुकुडकर (१५), दत्ता कडस्कर (५), वर्षा कडस्कर (२५), विमल कडासकर (५०) अशी विषबाधा झालेल्यांची नावे असून हे सर्व रुद्रापूर येथील रहिवाशी आहे.

घटनेच्या दिवशी रुद्रापूर येथील समीर भोयर यांच्या शेतात दोन किलो वजनाचे मशरुम उगवले होते. शेतीलगत हा भाग असल्याने शेतात विविध जातीच्या फळभाज्या लावल्या जातात. त्याचा उपयोग दैनंदिन जीवनात केला जातो. जनता कर्फ्यु असल्याने फळ, भाज्या यांची दुकाने बंद आहेत.परिणामी शेतात लावलेल्या भाजीपाल्यावर उपजीविका करण्याची वेळ निर्माण झाली. समीर भोयर याच्या शेतातील मशरुम घरी आणल्यानंतर परिसरातील लोकांना देण्यात आले. मात्र हे मशरुम विषारी असल्याने त्याची भाजी खाल्ल्यानंतर लगेचच सर्वांना उलटी, पोटदुखी, तोंडातून फेस येणे आदी विकार सुरू झाले. त्यामुळे त्यांना ताबडतोब सावली येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले. जखमीपैकी समीर भोयर, शुभम भोयर, प्रणोती भोयर, दुर्गा कुकुडकर, विमल कुकुडकर या पाच जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना गडचिरोली जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies