चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन येथे PCR ला आणलेले दोन आरोपी निघाले कोरोना पॉझिटिव्हचंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात काही पोलिस कर्मचाऱ्यांची कोरोना पॉझिटिव्ह 

चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील काही पोलिस कर्मचाऱ्यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय तीन दिवसांकरिता बंद करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.जिल्हाधिकारी कार्यालय,महानगरपालिका,जिल्हा परिषद व जिल्हा कारागृह नंतर आता थेट पोलिस खात्यातील सर्वेसर्वा असलेले जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या कार्यालयात कोरोना नी दस्तक दिल्याने जिल्ह्यात एकाच खळबळ उडाली आहे.


 


विश्वसनीय सुत्रांकडून प्राप्त महितीनुसार पोलिस अधीक्षक कार्यालय 3 दिवसांकरिता बंद करण्यात आले असून कोणालाही आत जाण्याची परवानगी नसणार आहे.संपूर्ण कार्यालय व कार्यालय परिसर सैनिटाइज करण्याचे काम सुरु झाले आहे.

चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन येथे PCR ला आणलेले दोन आरोपी निघाले कोरोना पॉझिटिव्ह


चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत दोन विविध गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहर पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे.  


चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन येथे दोन गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांचा  पीसीआर मंजूर करण्यात आला होता यादरम्यान त्यांना जेलमधून शहर पोलीस स्टेशन येथे आणले होते.या पीसीआरच्या प्रोसेस दरम्यान संपूर्ण खबरदारी बाळगत या कैद्यांची कोरोना  तपासणी जेलमधून बाहेर येत असताना आणि परत जेलमध्ये जात असताना करावी लगते लागतो.याच दरम्यान त्यांचा कोरोना अहवाल  पॉझिटिव्ह निघाले त्यामुळे आता जेल प्रशासन व कैदी आणि  शहर पोलीस स्टेशन मध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.याआधी देखील चंद्रपूर येथील कारागृहात पावणे दोनशेच्या जवळपास कैदी तर तीन ते चार अधिकाऱ्यांच्या कोरोणा अहवाल पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर येत आहे .

Post a comment

0 Comments