रामनगर पो. स्टे. चा मालखाना फोडणारा चोर अखेर अटकेत !
एकमेव MH34UPDATE NEWS ने लावले सगळ्यात आधी वृत्त !

24 तासाचा आत घेतले पोलिसांनी आरोपीला ताब्यात !

चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील रामनगर पोलीस स्टेशन हे गजबजलेले पोलीस स्टेशन आहे. या पोलीस स्टेशनचा 10 तारखेला मालखाना फोडण्यात आला. 11 तारखेला सर्वप्रथम हे वृत्त MH34UPDATE NEWS प्रकाशित केले होते. तत्संबंधी माहिती ही चंद्रपूरचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांना SMS व whatsapp द्वारे देण्यात आली. वृत्ताची त्वरित दखल घेत पोलिस अधिक्षकांनी तसे निर्देश दिल्यानंतर रामनगर पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात आरोपीला अटक केल्याची अधिकृत माहिती आज रामनगर पोलिसांनी काही पत्रकारांना दिली.

मिळालेल्या माहितीनुसार रामनगर पो. स्टे. चा मालखाना च्या मागील परिसरातील खिडकी फोडून ही चोरी करण्यात आली. या चोरीमध्ये आरोपीने सुगंधी तंबाखू चे काही डबे चोरी केल्या गेल्याचे सांगण्यात येत आहे. अक्षय रामू वाघमारे (वय १९) या युवकाला या प्रकरणात ताब्यात घेण्यात आले असून त्याचावर भादवी 457, 380 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरीचा माल हस्तगत करण्यात आला असून प्रकरणाचा पुढील तपास API मल्लिक यांचेकडे आहे. सदर घटना गुरुवार दि. 10 तारखेला घडली असल्याचे सांगण्यात येत आहे. रामनगर पोलीस स्टेशनच्या पोलिसांच्या नाकावर लिंबू पिळून झालेली ही चोरी चिंतेचा विषय आहे अशी चर्चा शहरांमध्ये होऊन राहिली आहे.

Post a comment

0 Comments