डिप्लोमा घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थिनीचा संचालकाने केला विनयभंग, तक्रारीवरून गुन्हा दाखल
गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : तुला मी दहा हजार रुपये देतो. आपण सेक्स करू. हे हजार रुपये ॲडव्हान्स ठेव, असे म्हणत पाचशे रुपयाच्या दोन नोटा देण्याचा त्याने प्रयत्न केला. पण, अल्पवयीन तरुणीने नकार दिला. यानंतर दुस-या खोलीत असलेल्या मैत्रीणीने आवाज दिल्याने ती बालंबाल बचावली. काल दुपारी गोंडपिपरीत विनयभंगाचा प्रकार घडला. याप्रकरणी आता आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

गोंडपिपरी येथे एक खाजगी मिनी आयटीआय आहे. कोेंढाणा येथील अमित अलोणे हा ही आयटीआय चालवितो. या माध्यमातून शिवणक्लास व इतर बाबींचे प्रशिक्षण दिले जाते. करंजी येथील दोन तरुणींनी या मिनी आयटीयात शिवणक्लाससाठी प्रवेश घेतला.

परीक्षाही झाली. रविवारी त्या डिप्लोमा घेण्याकरिता आयटीआय मध्ये गेल्या. दरम्यान, संचालक अमित अलोणे याने एका तरुणीला दुस-या खोलीत मासिक पाळीबाबत सविस्तर लिहिण्यासाठी सांगितले. दुसरीच्या सोबत तो अलंगट करू लागला. त्याने तिला अश्लील चित्रही दाखविले. यानंतर तिचा विनयभंग केला.

तुझ्यासोबत मी लग्न करतो. तुझ्या सोबत मला सेक्स करायचा आहे असे म्हटले. सोबत यासाठी दहा हजार रुपये तिच्या बॅकेच्या खात्यात टाकण्याचे आश्वासन दिले आणि यासाठी अॅडव्हान्स म्हणून त्याने पाचशेच्या दोन नोटा तिच्या हातात दिल्या. पण तरुणीने नकार दिला अन दुसऱ्या खोलीत असलेल्या मैत्रीणीने तिला आवाज मारताच हीच संधी साधून तिने आपली सुटका केली. यानंतर दोघेही घाबरलेल्या अवस्थेत आपल्या गावाला पोहचल्या.

घरी गेल्यानंतर तरुणीने घडलेला प्रसंग आई-वडिलांना सांगितला. यानंतर त्यांनी थेट गोंडपिपरी पोलिस स्टेशन गाठले. पोलिसांत घडलेल्या प्रकाराची तक्रार दिली. तरुणी अल्पवयीन असल्याने विनयभंग करणाऱ्या अमित अलोणेविरुद्ध पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करण्यात आली. प्रकरणाचा पुढील तपास गोंडपिपरीचे ठाणेदार संदीप धोबे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक धर्मराज पटले करीत आहेत.

Post a comment

0 Comments