Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

पूरग्रस्तांना देणार नमस्ते चांदा फाउंडेशन मदत
चंद्रपूर : शहरातील वर्गमित्रांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या नमस्ते चांदा फाऊंडेशनने आता पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रह्मपुरी, सावली तालुक्यातील अनेक गावांना पुराचा फटका बसला. या गावांतील अनेक कुटुंबे उघड्यावर आली आहेत. त्यांना भांडे आणि कपडे देण्याचा निर्णय नमस्ते चांदा फाउंडेशनने घेतला आहे.
मागील आठवड्यात गोसेखुर्द धरणाचे ३२ दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे वैनगंगा नदीला पूरला आला. ब्रह्मपुरी तालुक्यातील अनेक गावे वैनगंगा नदीकाठावरच वसली आहे. प्रामुख्याने लाडज, चिखलगाव, सोंदरी, पिंपळगाव भोसले यासह अन्य गावे दोन दिवस पाण्याखाली होती. 


हेलिकॉप्टरच्या मदतीने या गावांतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. पुराच्या पाण्यात अनेकांची घरे कोसळली. घरातील अन्नधान्य, संसारपयोगी साहित्य पाण्यात वाहून गेले. जनावरे वाहून गेली. मोठे नुकसान पूरग्रस्तांना सहन करावे लागते. राज्य शासनाने आता पूरग्रस्तांसाठी मदत जाहीर केली. ती त्यांना पुढेमागे मिळेल. मात्र, आपलंही समाजाला काही देणं आहे या हेतूने नुकताच स्थापन झालेल्या नमस्ते चांदा फाउंडेशनने पूरग्रस्तांना कपडे आणि भांडे पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. संपर्कासाठी ....
952910008180073550069766771743

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies