Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

घुग्घुस येथील स्थानिक एकेरी ट्रक चालक मालकांचे काम बंद आंदोलन Local singles truck drivers strike in Ghughhusरविवार ला सकाळ पासुनच नायगांव चेकपोस्ट जवळ घुग्घुस येथील स्थानिक एकेरी ट्रक चालक मालकांनी काम बंद आंदोलन करीत आपल्या १०० पल्ला गाड्या उभ्या ठेवल्या.
व काम बंद आंदोलन सुरु केले. ११ वाजता दरम्यान शिरपुर पोलीस स्टेशन चे सहा पो नि अनिल राऊत यांनी घटनास्थळी दाखल होऊन ट्रक चालक मालकांशी चर्चा केली व नायगांव कोळसा खाणीचे उपक्षेत्रीय प्रबंधक त्रिपाठी यांची चर्चा करुन आंदोलन स्थळी बोलाविले व मध्यस्थीने तोडगा काढला व मागण्यापुर्ण करण्यासाठी दोन दिवसाचा अवधी मागीतला. मंगळवारला शिरपुर पोलीस स्टेशन येथे मोठ्या ट्रान्सपोर्टरांची व एकेरी ट्रक चालक मालकांची बैठक बोलाविली आहे.
आश्वासना नंतर दुपारी एकेरी ट्रक चालक मालकांनी आपले आंदोलन मागे घेतले.


घुग्घुस येथील एकेरी ट्रक चालक मालकांच्या १०० पल्ला गाड्या आहे. परंतु १० मोठ्या ट्रक ट्रान्सपोर्ट कंपण्या टि कंपनी, सप्रा कंपनी, शाहकोल कंपनी, चढ्ढा कंपनी, एसिएस कंपनी, वंदना कंपनी, केएसटी कंपनी, जिएसटी कंपनी, पिटीसी कंपनी, जय संतोषी मां कंपनीच्या जवळ पास शेकडो गाड्या आहेत. त्यामुळे कोळसा वाहतुकीचा डिओ ते कमी दरात घेऊन आपल्या शेकडो ट्रकांद्वारे कोळसा वाहतुक करतात त्यामुळे एकेरी ट्रक चालक मालकांना ते कोळसा वाहतुकीचे परमिट देत नाही त्यामुळे स्थानिक एकेरी ट्रक चालक मालकांच्या ट्रकांना काम मिळत नसल्याने फायनांन्स कंपनीचे हफ्ते देने कठिन झाले आहे व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे.

मागील आठ महिण्यापासुन मोठ्या ट्रक ट्रान्सपोर्ट कंपण्या एकेरी मालकांच्या गाड्या लावत नसल्याने त्यांच्या कुटुंबीयावर उपास मारीची पाळी आली आहे.


यापुर्वी मागील महिण्यातही आपल्या मागणीसाठी एकेरी ट्रक चालक मालकांनी आपल्या ट्रका उभ्या ठेऊन काम बंद आंदोलन केले होते.
परंतु मोठ्या ट्रक ट्रान्सपोर्ट कंपण्या एकेरी ट्रक चालक मालकांच्या पल्ला गाड्या लावत नसल्याने त्यांनी रविवार ला नायगांव चेकपोस्ट जवळ ट्रक उभे करुन आंदोलन केले व समोर आपल्या ट्रकांना काम न मिळल्यास चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे 
आंदोलनात शांता यादव, शैलेश गिरी, नइम खान, अजय आमटे, दिलीप पांडे, सलीम सप्रा, बबलु सिद्दीकी, रोहन पोगला, सागर आरापेल्ली सहभागी झाले होते.

Post a comment

0 Comments