फक्त घोषणांचा "पाऊस", भितीने अनेक खाजगी रूग्णालये बंद तर 50 पेक्षा जास्त डॉक्टर "पॉझिटिव्ह !
मागील दोन महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोनाची भीषणता वाढली असतांनाचं पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर आणि जिल्ह्यातील आमदारांनी प्रशासनासोबत अनेक बैठका घेतल्या. चर्चा झाल्या. सल्ले दिले. परंतु पुढे काहीच झाले नाही फक्त घोषणांचा पाऊस पडला. केवळ "खरेदी" हाच कोविडवरील उपचार आहे, अशा तऱ्हेने या बैठका पार पडत आहे. आता चाळीस खाटांचे कोविड केअर सेंटर सिद्धार्थ हॉटेलजवळ निर्माण करीत आहे. यात शहरातील खासगी डॉक्टरांची सेवा आपत्ती व्यवस्थापन असे त्यांचे म्हणणे आहे. परंतु कोरोनाच्या भीतीने अनेक खासगी डॉक्टरांनी आपली रुग्णालये बंद केली. ते आता मनपाला सेवा देणार काय? याबाबत मनपाचे अधिकारीच साशंक आहे.
आता वैद्यकीय महाविद्यालयात प्रशासक !
शासकीय महाविद्यालयातील अनास्थेला बघता जिल्हाधिकाऱ्यांनी आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड सेंटरमध्ये उपविभागीय दंडाधिकारी यांची वैद्यकीय महाविद्यालयात प्रशासक, नियंत्रक व समन्वयक म्हणून नियुक्ती केल्याचे समजते. रुग्ण व त्यांच्या नातलगांना काही समस्या असल्यास त्यांच्या काही तक्रारी असल्यास त्यांना तात्काळ मांडता याव्या, यासाठी कोविड रुग्णालयात रुग्णांच्या नातलगांसाठी मदत कक्षही उभारण्यात येण्याचे सांगण्यात येत आहे.
0 Comments