घुग्घुस येथील आठवडी बाजारात सामाजिक अंतराचा फज्जा Ghughhus Gram Panchayat Administrators' sloppy planning
घुग्घुस हे औद्योगिक शहर आहे घुग्घुस परिसरात कोळसा खाणी, सिमेंट उद्योग, लाॅयड्स उद्योग आहे.
त्यामुळे घुग्घुस शहराची लोकसंख्या ५० हजाराच्या जवळपास आहे. घुग्घुस परिसरातील लगत अनेक छोटे गांव आहे.

घुग्घुस येथे दर रविवारला ग्रामपंचायतीच्या कार्यालया लगत मोठा आठवडी बाजार भरतो.
या आठवडी बाजारात घुग्घुस तसेच खेड़े विभागातील नागरीक बाजार करण्यासाठी येतात. परंतु आठवडी बाजारात सोशल डिस्टंनसिंगचे पालन करण्यात येत नाही आहे. आठवडी बाजारात मोठी गर्दी होत असल्याने नागरीक एकमेकांच्या संपर्कात येत आहे.त्यामुळे घुग्घुस शहरात कोरोना संसर्ग वाढण्याची भिती निर्माण झाली आहे.
घुग्घुस परीसरात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या १०० च्यावर गेली आहे.

घुग्घुस ग्रामपंचायत कार्यालयातील प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका सामन्य जनतेस बसत आहे.
आठवडी बाजाराच्या नियोजन शुन्यते मुळे घुग्घुस शहरात कोरोना संसर्ग वाढण्याची भिती निर्माण झाली आहे.
त्यामुळे जिल्हा प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी जोर धरत आहे.

Post a comment

0 Comments