Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

घनकचऱ्याचा भ्रष्टाचार गडचांदूर न.प. च्या डोक्यावर Gadchandur N.P. Solid waste contract sitting on the lap of!
घनकचऱ्यावरून गडचांदूर च्या नेत्यांचे आर्थिक राजकारण!


कर्तव्यदक्ष (?) सी.ओ. शेळकी आता गप्प कां?


गडचांदुर नगर परिषद च्या मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळकी या मागील काही वर्षापासून गडचांदूर येथे मुख्याधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यकाळातच घनकचऱ्याचे कंत्राट देण्यात आले होते. कंत्राटदारासोबत केलेल्या करारानुसार न.प. मध्ये असलेल्या घंटागाड्या या कंत्राटदारांना वापरायच्या होत्या व त्याची दुरुस्ती सुद्धा कंत्राटदारालाच करायची होती, अन्यथा त्यावर दंडात्मक कारवाई ची तरतुद होती. कंत्राटदारांनी सर्व नियम मोडीत काढून आपली मनमर्जी चालवली. आज घनकचऱ्याच्या या गाड्या गडचांदुर नगर परिषद कार्यालयाच्या अगदी वर पडल्या आहेत. घनकचऱ्याचा भ्रष्टाचार गडचांदूर न.प. च्या डोक्यावर आहे आणि मुख्याधिकारी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांचे याकडे बिलकुल लक्ष नाही ही बाब शोचनीय आहे. गडचांदूर न.प. च्या स्वत:ला अतिशिस्तप्रीय समजणाऱ्या मुख्याधिकारी यांच्या निदर्शनास या बाबी न येणे म्हणजे कुठेतरी पाणी मुरतंय असे लक्षात येते. आज या घनकचऱ्याच्या कंत्राटदारांनी गडचांदुर नगर परिषद ची वाट लावली आहे. "स्वच्छतेकडून अस्वच्छतेकडे" असा "अर्थ"पुर्ण मार्ग कंत्राटदाराकडून अवलंबिल्या गेल्यानंतर ही तसेच नियम व अटी शर्तीना तिलांजली दिल्यानंतरही गडचांदूरच्या कर्तव्यदक्ष (?) मुख्याधिकारी डॉ. शेळकी या गप्प कशा हा एक संशोधनाचा विषय आहे.

गडचांदूर : गडचांदूर मध्ये मागील काही महिन्यांपासून घनकचरा कंत्राटावरून सुरू असलेल्या वादाला स्थानिक राजकीय नेत्यांची आर्थिक किनार आता चर्चेचा विषय ठरत आहे. गडचांदुर नगर परिषद मध्ये घनकचरा उचलण्याचे कंत्राट बल्लारपूर येथील एका मोठ्या कंत्राटदाराला देण्यात आले, परंतु हा घनकचरा नियम व अटी-शर्तीप्रमाणे उचलला जात नसून काही स्थानिक राजकीय नेत्यांची आर्थिक संगणमत करून उलाढाल या ठिकाणी होत आहे, गडचांदूर च्या स्वच्छतेपेक्षा काही नेत्यांना "आर्थिक उलाढाली"मध्ये अधिक रस असल्यामुळे गडचांदूर मध्ये "स्वच्छतेकडून अस्वच्छतेकडील" राजकारण होतांना दिसत आहे. या प्रकरणात गडचांदूर येथील "एक मार खाया" एक स्थानिक नेता बराच चर्चेचा विषय ठरत आहे. या घनकचरा प्रकरणातील उलाढाली मध्ये सत्ताधारी कॉंग्रेसचे ही काही दलाल पुर्वीपासून सक्रीय असल्याची चर्चा आहे.

युवक कल्याण सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था यांना जानेवारी 2019 मध्ये गडचांदूर शहराच्या घनकचरा उचलण्याचे कंत्राट देण्यात आले होते. अटी व शर्ती ना डावलून कंत्राटदार आपली मनमर्जी करत असल्यामुळे अनेकांनी या संदर्भात तक्रारी केल्या परंतु गडचांदूर न.प. प्रशासन कोरोना व संचारबंदी चे कारण पुढे करीत कंत्राटदारांची चौकशी करण्यासाठी पुढे सरसावला नाही.

कंत्राटदाराची स्थानिक नेत्यांसोबत आर्थिक सांठ-गाठ!
गडचांदुर च्या न. प. च्या काही स्थानिक नेत्यांची कंत्राटदारांसोबत आर्थिक साटेलोटे असल्याचे बोलल्या जाते. गडचांदूर चा "तो मार खाया" दलाल नेता कंत्राटदाराचा माणूस असून आतापावेतो  तक्रारकर्त्यांची कंत्राटदारासोबत आर्थिक "सेटींग" करण्यात हा "मार खाया दलाल" नेता अग्रेसर होता, असे सांगीतल्या जात आहे.

संशोधनाचा विषय असलेले न.प. चे आवक-जावक विभाग!
गडचांदूर न.प.चे आवक-जावक विभाग हा संशोधनाचा विषय आहे. बंडू वांढरे नावाची व्यक्ती आवक-जावक विभाग सांभाळतात. त्यांच्यासोबत पेंदोर नावाची कंत्राटी काम करणारी एक महिला सहकारी म्हणून याठिकाणी कार्यरत आहे. दुसऱ्या बाजूने बघतो म्हटलं तर आवक-जावक विभाग हा प्रत्येक शासकीय विभागातील महत्त्वाचा भाग असतो. येणारी पत्रे, तक्रारी, निवेदने ही त्या-त्या विभागापर्यंत पोहोचविण्याचे कार्य या विभागाचे असते. त्या ठिकाणी कंत्राटी कामगार कसा बसविण्यात आला हा तपासाचा भाग आहे. मिळालेल्या माहितीनुसार घनकचऱ्याशी संबंधित आलेल्या तक्रारी आवक-जावक विभागांमधून थेट कंत्राटदारांकडे पोचविल्या जातात. या कामाचे सूत्र गडचांदूर चा "एक मार खाया"  नेता सांभाळत असल्याचे सांगण्यात येते.
गडचांदुर नगर परिषद च्या घनकचऱ्याच्या कंत्राटाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies