रविवार दिवस असल्याने चिकन सेंटर उघडुन चिकन विक्री सुरु असल्याने चिकन सेंटर मध्ये ग्राहकांची मोठी गर्दी होत असल्याने कोरोना पसरण्याची भती निर्माण झाली आहे.
चिकन सेंटर कड़े घुग्घुस पोलीसांचे तसेच घुग्घुस ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
घुग्घुस येथे दिनांक २५ सप्टेंबर ते १ आॅक्टोंबर पर्यंत जनता कर्फ्यु लावण्यात आला आहे. किराना दुकान, कापड दुकान, हाॅटेल पुर्णता बंद आहे.
परंतु रविवार दिवस असल्याने मासाहार करना-याची संख्या लक्षात घेत घुग्घुस येथील मशीदी जवळ, रेल्वे पुला लगत, शालिकराम नगर रस्त्यावर चिकन सेंटर मालकांनी ब्रायलर चिकन दुकाना समोर ठेऊन दुकानात कापुन विक्री सुरु ठेवली त्यामुळे दुचाकिंच्या रांगा लागल्या ग्राहकांची मोठी गर्दी गोळा झाल्याने नागरिक एकमेकांच्या संपर्कात येत आहे. त्यामुळे घुग्घुस येथे चिकन सेंटरच्या दुकानदारांनी चक्क जनता कर्फ्युचा फज्जा उडाविला आहे.
परंतु पोलीस व ग्रामपंचायत प्रशासन केवळ बघ्यांची भुमीका घेत असल्याने नागरीकांत रोष निर्माण झाला आहे.
0 Comments