बाबूपेठ येथे कर्तव्य बजावणाऱ्या वनरक्षकास बेदम मारहाण Forest ranger on duty at Babupeth beaten to death
चंद्रपूर – शनिवारी 12 सप्टेंबरला बाबूपेठ वन क्षेत्रातील वनरक्षक विशाल मंत्रीवार यांना फर्निचर विक्रेत्यांनी मारहाण केल्याने एकच खळबळ उडाली.


शनिवारी सायंकाळच्या सुमारास बाबूपेठ आंबेडकर चौक येथील एम.एम. फर्निचर मार्ट येथे अवैध सागवाणाची कटाई होणार असल्याची माहिती मिळाली असल्याने वनरक्षक मंत्रीवार हे आपल्या सहकाऱ्यांसोबत तिथे पोहचले असता त्यांना ओल्या सागवणाचे लाकूड दिसले त्यांनी याबद्दल विचारपूस केली असता फर्निचर दुकान मालक सौ कुरेशी यांनी वनरक्षक मंत्रीवार यांना अश्लील शब्दात शिवीगाळ करीत आमच्या कामात टांग अडवू नको नाहीतर बरे होणार नाही अशी धमकी दिली, यानंतर कुरेशी यांचे पती व 1 अज्ञात मुलाने मंत्रीवार यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

मंत्रीवार यांच्या सहकाऱ्यांनी कुरेशी यांना अडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांना सुद्धा मारहाण करण्यात आली, या मारहाणीत मंत्रीवार यांच्या गळ्यात असलेली सोन्याची चैन कुरेशी यांनी हिसकावून स्वतः जवळ ठेवली, यानंतर ते सागवणाचे लाकूड एका गाडीत टाकून दुसरीकडे नेण्यात आले.


मंत्रीवार व त्यांचे सहकारी यांनी तात्काळ शहर पोलीस स्टेशन गाठून सदर प्रकरणाची तक्रार नोंदविली, शासकीय कामात अडथळा निर्माण करून ड्युटीवर असलेल्या वनरक्षक व सहकारी यांना मारहाण करण्याचा गुन्हा नोंद करीत कलम 353 अंतर्गत दाखल करण्यात आला.

पुढील तपास शहर पोलीस स्टेशन करीत आहे.

Post a comment

0 Comments