लोयडस मेंटल्स कंपनीतील अपघाताची मालिका शुरुच
ठेकेदारी कामगारांचे पांच ही बोटे तुटली

घुग्घुस :- येथील लोयडस मेंटल्स कंपनीचा गलथानपना नेहमीच समोर येत असतो.
कामगार सुरक्षेचे काही देणे - घेणे नसलेल्या कंपनीत मागील काही वर्षांत अनेक कामगारांचे अपघातात जीव गेले असून याकरीता निर्माण झालेल्या जन असंतोषामुळे कंपनीतर्फे मृत कामगारांच्या कुटुंबातील लोकांना लाखो रुपयांचा मोबदला ही दिला आहे.
दिनांक 31 ऑगस्ट रोजी लोयडस कंपनीतील रवी ठाकरे यांच्याकडे कार्यरत कंत्राटी कामगार नितीन अर्जुन शेंडे यांचा चालत्या उपकरणात हात जाऊन उजव्या हाताचे पूर्ण पांच ही बोटे छाटल्या गेली त्याला उपचारासाठी चंद्रपूर येथील हेमंत पुट्टेवार यांच्याकडे नेण्यात आले.
मात्र गंभीर स्थिती लक्षांत घेता त्याला नागपूर येथे पाठविण्यात आले आहे.
कंपनीतर्फे त्याला आर्थिक मोबदला मिळावा अशी नागरिकांची मागणी आहे.

Post a comment

0 Comments