केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, अधिक वय असलेले प्राध्यापक, गर्भवती कर्मचारी, प्राध्यापक, आजारांची पार्श्वभूमी असलेले कर्मचारी आणि प्राध्यापक यांना परीक्षा केंद्रावर काम देऊ नये अशा स्पष्ट सूचना विद्यापीठ आणि शिक्षण संस्थांना देण्यात आल्या आहेत.
मार्गदर्शक सूचना
1. जास्त गर्दी होणार नाही अशा प्रकारे आसन व्यवस्थेचे नियोजन करावे.
2. जागोजागी साबण, सॅनिटायझर, मास्क आदींची उपलब्धता करुन द्यावी.
3. विद्यार्थ्यांनी स्वत:चे मास्क, पाण्याची बाटली, सॅनिटायझर, ओळखपत्र बाळगावे.
4. शिस्तीचे पालन करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ पुरवावे.
5. आवश्यक त्या वर्ग खोल्या उपलब्ध करुन द्याव्यात.
6. केंद्रावर थर्मल स्क्रीनिंगची सुविधा उपलब्ध करुन द्यावी.
7. संस्थांनी वाहतूक व्यवस्था उपलब्ध केल्यास त्यासाठी सॅनिटाझ केलेल्या गाड्या वापराव्यात.
8. एखाद्या विद्यार्थ्याला कोरोनाची लक्षणे असतील, तर त्याला जवळील आरोग्य केंद्रातून परीक्षा देण्याची सुविधा द्यावी.
9. ये-जा करण्यासाठी पुरेसे मार्ग उपलब्ध असावेत.
10. केंद्राचे सातत्याने सॅनिटायझेशन करावे.
11. केंद्रावर आल्यानंतर कोणाला लक्षणे आढळल्यास त्यांचे विलगीकरण करावे.
12. आरोग्य सेतू अॅप सर्वांसाठी बंधनकारक.