वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू तर एक जखमी A farmer was killed and another was injured in a lightning strike

ब्रम्हपुरी तालुक्यात एका महीन्यातील दुसरी घटना

ब्रम्हपुरी : शेतात काम करीत असतांना अचानकपणे वीज पडल्याने एक जण जागीच ठार झाला तर एक जण जखमी झाल्याची घटना तालुक्यातील गोगाव शेतशिवारात आज दि. २९ सप्टेंबर ला सायंकाळी ६ च्या सुमारास घडली आहे.
यामध्ये मृतकाचे नाव अरविंद तिजारे (वय ४०) रा. तळोधी खुर्द असे असुन जखमीचे नाव नंदु बडगे (वय३५) रा. गोगाव असे आहे.
सविस्तर माहीतीनुसार मृतक नंदू बडगे हा अल्पभुधारक शेतकरी असल्याने त्याने गोगाव शेतशिवारात भाडेतत्वावर शेती केली होती. तिथेच तो आपल्या शेतीवर काम करण्यासाठी गेला होता. सोबत त्याच्या बहीनीचा पती सुध्दा होता. तेव्हा आज दि. २९ सप्टेंबर ला सायंकाळी ६ च्या सुमारास मेघगर्जनेसह पावसाला सुरवात झाली. आणि अचानकपणे वीज मृतक अरविंद च्या अंगावर पडली. त्यामुळे तो जागीच ठार झाला. तर त्याच्या सोबत असलेला नंदू बडगे हा जखमी झाला.
मृतकाच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा आप्त परीवार आहे.
ब्रम्हपुरी तालुक्यात या महीन्यात वीज पडुन मृत्यू झाल्याची ही दुसरी घटना असुन काही दिवसांपूर्वी पारडगाव येथील पतीपत्नी च्या धावत्या दुचाकीवर वीज पडून दोघांचाही मृत्यू झाला होता

Post a comment

0 Comments