Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार Farmer killed in tiger attack
राजुरा तालुक्यातील नवेगाव गावांतील महिन्यातील दुसरी घटना

राजुरा : मध्य चांदा वन विभाग अंतर्गत येत असलेल्या राजुरा तालुक्यातील विरुर वन परिक्षेत्र नवेगाव नियत क्षेत्रातील कक्ष क्रमांक. 145 मध्ये नवेगाव येथील गोविंदा भीमराव मडावी(70) यांच्यावर वाघाने हल्ला करून जागीच ठार केल्याची घटना आज दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली आहे.

वनविभागाने पंधरा दिवसांत वाघाचा बंदोबस्त करू अशी आश्वासन दिले मात्र पुन्हा या घटनेत भर पडल्याने शेतीचे संगोपन व रक्षण करणे हे शेतकऱ्यांना कठीण झाले आहे. सदर घटनेची माहिती मिळताच विरुर चे ठाणेदार कृष्णकुमार तिवारी, वडतकर व वनविभागा चे अधिकारी घटनास्थळी पोहचून घटनेचा पंचनामा केला.  

काही महिन्यापुर्वीच याच गावातील एका शेतमजुराचा वाघाचे हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना घडली होती.

विशेष म्हणजे मागील 6 महिने पासून राजुरा व विरुर वनक्षेत्रात वाघाने धुमाकूळ घातला असून त्याने आतापर्यंत 6 सहा जणांचा बळी घेतला आहे यामुळे या भागात वाघाची प्रचंड दहशत आहे त्याला पकडण्यासाठी वनविभागाचे चमू रात्र दिवस जागरण करीत असूनही वाघ मात्र वन कर्मचाऱयाच्या तावडीत सापडला नसल्याने जनतेत तीव्र संताप व्यक्त होत असून आता या वाघाला ठार माराच अशी आग्रही मागणी केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies