ब्रम्हपुरी:- ब्रम्हपुरी तालुक्यातील रुई येथिल शेतकरी दिगांबर नागमोती ( 55 ) यांचा दुपारी बारा वाजता घरच्या शेतात विद्युत शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना दि .। 3 सप्टेंबर ला घडली. रुई येथील शेतकरी दिगांबर नागमोती यांचे शेती खरकाडा फाट्याजवळ आहे. नागमोती हे सकाळी शेतावर गेले होते धान पिकासाठी पाण्याची गरज असल्याने मोटरपंप चालू केले. शेताला पाणी झाल्याने मोटर बंद करण्यासाठी दिगांबर नागमोती गेले असता मोटार बंद करीत असताना विद्युत रॉक लागून दिगांबर नागमोती यांचा मृत्यू झाला.
हि दुर्दैवी घटना मुलाच्या डोळ्यासमोरच घडली. शवविच्छेदनाकरिता मृतकाला ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरीला येथे नेण्यात आले. त्याच्या मृत्यूने परिवारावर दुःखाचे डोगर कोसळले आहे. परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मागील वर्षीही रुई येथील तरुण शेतकऱ्याचा विद्युत शॉकने मृत्यू झाला होता.
0 Comments