Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या रूपाने जिल्ह्याला लाभलेले कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक !
चंद्रपूर :- जिल्ह्याला आत्तापर्यंत 24 पोलिस अधीक्षक लाभले आहेत. डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या रूपाने लाभलेले पोलीस अधीक्षक हे 24 वे पोलिस अधीक्षक होते. अनेकांनी आपल्या कार्यामुळे जिल्हा वासियांच्या मनामध्ये एक वेगळा ठसा उमटवला आहे त्यामधील एक असे "रेड्डी" यांचे नाव घेता येईल. 30 जुलै 2018 रोजी डॉ. महेश्वर रेड्डी यांनी जिल्ह्याची धुरा सांभाळली. युवकांचे आयकॉन अशी प्रतिमा त्यांनी जिल्ह्यात निर्माण केली त्यांच्या नावाचा दबदबा सुद्धा निर्माण करण्यात ते यशस्वी झाले. आपल्या तीन वर्षांच्या कार्यकाळात अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी राबवले. नम्र स्वभावाचे आणि तेवढेच शिस्तप्रिय अशी त्यांची जिल्ह्यात प्रतिमा निर्माण झाली. आपल्या कार्यकाळात त्यांनी सुरु केलेल्या अनेक उपक्रम हे जिल्हावासीयांसाठी लाभकारी ठरले आहेत. त्यामधील विशेष म्हणजे पोलिस सारथी, भरोसा सेल, beat app यांच्या विशेषत्वाने उल्लेख करण्यात येऊ शकतो. 1091 या क्रमांकावर डायल करून संकटात सापडलेल्या महिला मुली व ज्येष्ठ नागरिकांना मदत करण्यासाठी त्यांना घरी पोचविण्यासाठी कारवान कार्यान्वित करण्यात आलेली ही पोलीसासाठी योजना विशेष प्रभावशाली राहिली. त्याचप्रमाणे डॉक्टर महेश्वर रेड्डी यांच्या कार्यकाळात चोरीला गेलेले दुचाकी वाहन, महागडे मोबाईल त्या-त्या ग्राहकापर्यंत सन्मानाने त्यांच्या हवाली करण्याचे स्मरणातले विशेष कार्य त्यांच्या कार्यकाळात त्यांनी घडवून आणले. कर्तव्य बजावताना कोणतेही मानसिक दडपण न ठेवता समोरच्याची समस्या गांभीर्याने ऐकून त्याचे समाधान कसे करता येईल याकडे महेश्वर रेड्डी यांनी विशेष लक्ष दिले त्यामुळे ते जिल्हावासीयांसाठी आपले वेगळे स्थान बनविण्यात यशस्वी झाले.ए-निगेटिव्ह या दुर्मिळ रक्तगटाचे असलेले डॉ. रेड्डी यांनी दोनदा आवश्यकता असतांना स्वत:हून केलेले रक्तदान त्यांच्या समाजकार्याची जान करून देणारे आहे

संपूर्ण जगामध्ये कोरोना ची भयावह परिस्थिती निर्माण झाल्यानंतर चंद्रपूर जिल्हा फक्त दोन अधिकाऱ्यांच्या कल्पकतेने सुरक्षित राहिला. त्यातील एक म्हणजे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार व दुसरे म्हणजे चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी हे आहेत. माध्यमे, सोशल माध्यमे, वृत्तपत्र मीडिया यांनी या गोष्टी आवर्जून उल्लेखित केल्यात. डॉक्टर महेश्वर रेड्डी व नुकतेच बदली होऊन गेलेले डॉ. कुणाल खेमणार या वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत असलेल्या या दोन्ही व्यक्तींचे कोरोना संकटकाळातील कार्य जिल्हावासीयांसाठी नेहमी स्मरणात राहील.
गडचिरोली येथून चंद्रपूरला पदोन्नतीवर आलेले डॉ. महेश्वर रेड्डी जिल्ह्याच्या कारभार सांभाळू शकतील की नाही अशी शंका सुरुवातीला व्यक्त केल्या जात होती. परंतु पदभार सांभाळल्यानंतर त्यांनी धाडसाने केलेले कार्य हे जिल्हा वासियांसाठी स्मरणात राहणारे आहे. जिल्ह्यामधील दारूची समस्या ही मोठी आहे. दारूबंदी नंतर या जिल्ह्याला चार पोलिस अधीक्षक लाभले. नवीन येणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना जिल्ह्यात घडणारे दारू विषयीची गुन्हे हाताळायला व समजायला अवधी लागतो. यामध्ये मुख्यत्वेकरून काही अधिकाऱ्यांचे कार्य हे वेगळ्या पद्धतीमुळे जिल्हावासियांसाठी परिचीत राहीले. आपल्या विशेष कार्यशैलीमुळे पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी आपली जिल्ह्यात निर्माण केलेली प्रतिमा ही जिल्हावासियांसाठी आठवणीतीलचं आहे, यात संशय नाही.

चंद्रपूर जिल्ह्याला आतापावेतो 28 पोलिस अधीक्षक लाभले आहेत. काही पोलिस अधीक्षकांनी जिल्हावासीयांना आपली वेगळी छाप निर्माण करण्यात यश मिळवले. त्यामधील त्या काळातील नेगी नावाचे पोलीस अधीक्षक हे जिल्हावासीयांनासाठी गर्वाचा विषय राहिलेत. यासोबतच भुषणकुमार उपाध्याय, शहीद हेमंत करकरे, अब्दुल रहमान अशा काही पोलीस अधीक्षकांचा विशेषत्वाने उल्लेख करण्यात येऊ शकतो. नुकतेच 28 वे पोलिस अधीक्षक म्हणून लाभलेले डॉ. महेश्वर रेड्डी हे त्यांच्या कार्यकर्तुत्वामुळे जिल्ह्यामध्ये युवकांसाठी विशेष आकर्षण ठरले कर्तुत्वासोबत सामाजिक कार्याची भान असणारे पोलीस अधीक्षक अशी त्यांची जिल्ह्यामध्ये ओळख निर्माण झाली होती. आपल्या सामाजिक कार्यामुळे त्यांची प्रतिमा जरा हटके निर्माण झाली. अधिकारी म्हणून कार्य करतांना अधिकाऱ्यांनी घेतलेले निर्णय कायम नागरिकांच्या लक्षात असतात, या अधिकाऱ्यांचे हेच निर्णय त्यांना त्यांची वेगळी ओळख निर्माण निर्माण करून देणारे असतात.  डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या कार्यकाळ ही जिल्ह्यात स्मरणीय असाच राहिला. नुकतेच त्याची बदली झाली, त्यानिमीत्त दोन शब्द....!

मनोज पोतराजे
संपादक :- MH34UPDATE NEWS

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies