परिवहन महामंडळाच्या चंद्रपूर येथिल विभागीय कार्यशाळेत कोरोनाने शिरकाव केला असून आतापर्यंत 10 कर्मचारी कोरोना बाधित असल्याची विश्वसनीय माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
दिनांक 28 ऑगस्ट रोजी विभागीय कार्यशाळेत पहिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला होता. ही संख्या आता 10 वर पोहोचली असुन आज एकाच दिवशी 3 कर्मचारी पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले असे कळले आहे.
विश्वसनीय माहितीनुसार काल कर्मचाऱ्यांनी विभागीय कार्यालय 13 सप्टेंबर 2020 ते 16 सप्टेंबर 2020 असे 4 दिवस बंद करण्यासाठी निवेदन दिले होते आज त्यावर सकारात्मक निर्णय घेण्यात आला असुन उद्या पासुन पुढील 4 दिवस विभागीय कार्यालय बंद ठेवण्यात येणार असुन त्यानुसार जिल्हाधिकारी चंद्रपूर तसेच महानगरपालिका आयुक्तांना महामंडळाकडुन माहिती देण्यात आली आहे.