विज पडून दोघांचा मृत्यूराजुरा तालुक्यातील सिंधी या गावातील रहवासी शेतकरी रवींद्र बळीराम रामटेके यांचे स्वताच्या शेतात काम करीत असतांना अंगावर वीज पडून जागीच ठार झाला. आज तालुक्यात पावसाचे वातावरण झाले मात्र पावसालाकाही जोर नव्हता. दरम्यान मृतक रवींद्र रामटेके व काही मजूर फवारनीचे काम करीत होते.पाऊस नसल्याने ते आपल्या कामात गुंतले असतांना अचानक वीज पडली यावेळी सोबतचे सहकारी थोडक्यात बचावले परंतु रवींद्र चा मात्र जागीच जीव गेला. मृत्यू पश्चात पत्नी आणि एक मुलगा एक मुलगी असा आप्तपरिवार आहे.मृतदेह उत्तरीय तपासणी शवविचेदनाकरिता राजुरा येथे आणण्यात आला.तर दुसऱ्या घटनेत आज अचानक आलेल्या वादळी पावसात वीज पडल्याने शेतात काम करीत असलेल्या लहानुबाई शंकर जाधव हिचा मृत्यू झाल्याची घटना घडली.गोंडपीपरी तालुक्यातील परसोडी येथील सुरेंद्र मत्ते याचे शेतात मजुरी साठी काही महिला गेल्या होते दरम्यान चार वाजेच्या सुमारास अचानक वादळी पाऊस आला अश्यातच वीज कडाडली आणि शेतात असलेली लहानुबाई जाधव वर वीज कोसडली त्यात तिचा मृत्यू झाला.माहिती मिळताच कोठारी पोलीस व प्रशासकीय कर्मचारी या गावात येऊन पुढील कार्यवाई करीत आहेत.

Post a comment

0 Comments