दोन संशयित युवकांना पोलीसानी केली अटक, मात्र सुपारी देणारा अजूनही फरार ? पोलिसांचा शोध सुरू.
वरोरा पोलीस स्टेशन हद्दित येणाऱ्या खाबांडा परिसरात आज अपहरण झालेल्या विष्णु बालाजी कष्टि यांचा म्रूतदेह विक्षिप्त व छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली असून म्रुतक हा खाबांडा गावचा रहिवाशी होता त्याचे वय ३६ होते आणि तो मागील दोन दिवसापासून स्वतः च्या मालकीची गाडी पँलटिना घेवून गायब होता व त्याचे अपहरण झाल्याचा संशय परिवारातील सदस्यांनी वरोरा पोलिस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीत व्यक्त केला होता, या संदर्भात वरोरा पोलिसांनी आपला तपास सुरू केला होता व वायरलेस मेसेज करून महाराष्ट्रातील सर्व पोलिस स्टेशन मधे म्रूतकाचा हुलीया व गाडी क्रमांक कळवला होता त्यामुळे सदर गाडी काल रात्रीच्या सुमारास समुद्रपुर तालुक्यातील पेट्रोलिगवर असणाऱ्या पोलीसांना दोन युवक घेवून जात असताना दिसली असता त्या युवकांना पोलिसांनी विचारपुस केली, त्यात त्यांची उलटसुलट माहिती बघता त्या दोन युवकांना वरोरा पोलीसाच्या ताब्यात देण्यात आले. वरोरा पोलिसांनी आपल्या पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी त्याचा मृतदेह खाबांडा येथील जिनिंग प्रेसीग जवळ असल्याची कबुली दिली, त्यामुळे म्रूतदेह ताब्यात घेऊन पोलीसानी दोन युवकांना अटक केली मात्र हा खून सुपारी देवून करण्यात आला असल्याची माहिती आहे, त्यामुळे वरोरा पोलिस आता त्या सुपारी देणाऱ्या चौधरी नामक राजस्थानी व्यक्तीला पकडेल की तो फरार होण्यात यशस्वी होईल ? याबद्दल चर्चा रंगत आहे, महत्वाची बाब म्हणजे ज्या आरोपींना ताब्यात घेण्यात आले त्यांनी चौधरी नामक एका राजस्थानी व्यक्तीकडून सुपारी घेतली असल्याची चर्चा असल्याने पोलिसांना आपल्या तपासाचे चक्र वेगाने फिरवावे लागणार आहे. मृताच्या मागे पत्नी, २ वर्षाचा मुलगा आई वडील ,व दोन भाऊ आहे.