शहरातील रयतवारी येथील बीएमटी चौकात भर दुपारी एका युवकाची घरात घुसून धारधार शस्त्राने हत्या करण्यात आली होती.
या हत्येला काही तास उलटले नाही त्यावेळीच मृतकांच्या नातेवाईकांनी आरोपीच्या काकाला मारहाण करीत खून केला.
पोलिसांनी तात्काळ करन केवट या पहिल्या हत्येतील आरोपीला अटक केली, नंतर दुसऱ्या हत्येतील आरोपींना सुद्धा पोलिसांनी अटक केली.
हत्येचं नेमकं कारण म्हणजे
रयतवारी कॉलनी बीएमटी चौक परिसरात करण अर्जुन केवट हे राहत होते. त्यांच्या भावाला काही दिवसांपूर्वी रामनगर पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात अटक केली.
तपासादरम्यान त्याने आपण चोरी केली नसून, सरफराज सागीर सयद, समीर सागीर सयद, रिझवान सिद्दीकी या तिघांनी चोरी केल्याचे सांगितले. तसेच संबंधित दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासून सत्यता जाणून घेण्यास सांगितले. त्यानुसार पोलिसांनी दुकानाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता पोलिसांना सत्य आढळून आले. त्यानुसार पोलिसांनी सरफराज सागीर सयद, समीर सागीर सयद, रिझवान सिद्दीकी या तिघांना अटक करून गुन्हा दाखल केला.
त्यानंतर त्यांची कारागृहात रवानगी केली. परंतु, या तिघांच्या मनामध्ये पोलिसांना माहिती देणाऱ्याविषयीचा राग होता. त्या तिघांनी कारागृहातच त्याच्या खुनाचा कट रचला. कारागृहातून सुटका झाल्यानंतर संबंधित युवकाचे घर गाठले. घराचा दरवाजा उघडताच या तिघांनी धारदार शस्त्राने युवकावर हल्ला केला. त्यात करण अर्जुन केवट याचा मृत्यू झाला. हल्लेखोर एका भावाला मारण्यासाठी गेले. परंतु, दुसऱ्या भावाचाच यात जीव गेला.
घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक चंदा दंडवते यांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. पंचनामा केला. मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. त्यानंतर सरफराज सागीर सयद, रिझवान सिद्दीकी या दोघांना अटक केली. तर, फरार समीर सागीर सय्यदचा तपास सुरू केला आहे.
अटकेतील हल्लेखोरांना पोलिस ठाण्यात आणल्यानंतर मृताच्या नातेवाइकांनी रामनगर पोलिस ठाणे गाठून कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी गोंधळ घातला. त्यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. याप्रकरणी पुढील तपास उपविभागीय अधिकारी शीलवंत नांदेडकर, रामनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रकाश हाके यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.