कर्तव्यासोबत सामाजिक भान असलेले पोलिस अधिक्षक "डॉ. महेश्वर रेड्डी"Socially conscious Superintendent of Police "Dr. Maheshwar Reddy"
चंद्रपूर जिल्ह्याला आतापावेतो 28 पोलिस अधीक्षक लाभले आहेत. काही पोलिस अधीक्षकांनी जिल्हावासीयांना आपली वेगळी छाप निर्माण करण्यात यश मिळवले. त्यामधील त्या काळातील नेगी नावाचे पोलीस अधीक्षक हे जिल्हावासीयांनासाठी गर्वाचा विषय राहिलेत. यासोबतच भुषणकुमार उपाध्याय, शहीद हेमंत करकरे, अब्दुल रहमान अशा काही पोलीस अधीक्षकांचा विशेषत्वाने उल्लेख करण्यात येऊ शकतो. नुकतेच 28 वे पोलिस अधीक्षक म्हणून लाभलेले डॉ. महेश्वर रेड्डी हे त्यांच्या कार्यकर्तुत्वामुळे जिल्ह्यामध्ये युवकांसाठी विशेष आकर्षण ठरले कर्तुत्वा सोबत सामाजिक कार्याची भान असणारे पोलीस अधीक्षक अशी त्यांची जिल्ह्यामध्ये ओळख निर्माण झाली. आपल्या सामाजिक कार्यामुळे त्यांची प्रतिमा जरा हटके निर्माण झाली नुकतेच त्यांनी केलेले ब्लड डोनेशन हे त्यांच्या छवीला निखारणारा आहे.
सलाम साहेब आपल्या कार्याला....!

सविस्तर वृत्त  दिनांक ४ सप्टेंबर रोजी बंडू गुरनुले नामक रुग्णाला A- (negative) या दुर्मिळ रक्तगटाची  गरज होती, त्यांनी सर्वीकडे शोध घेतला परंतु त्यांना  ( A- ) गटाचा रक्तदाता मिळत नव्हते तेव्हा त्यांनी रक्तदान महादान  निस्वार्थ सेवा फाऊंडेशनला संपर्क करून कळवण्यात आली तेव्हा तत्काळ A- रक्तदात्याचा शोध घ्यायला सुरुवात झाली तेव्हा चंद्रपूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक मा. डॉ. महेश्वर रेड्डी सर यांचे रक्तगट सुद्धा (A- ) आहे असे लक्षात आले तेव्हा त्यांच्याशी संपर्क केला असता पोलिस अधीक्षक  डॉ. महेश्वर रेड्डी यांनी तत्काळ येऊन रक्तदान केले, त्यांच्या या कार्याला रक्तदान महादान निस्वार्थ सेवा फाऊंडेशनचा वतीने मानाचा मुजरा  देण्यात आला अशा कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षकांचे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सर्व स्तरावरून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Post a comment

0 Comments