Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याच्या दारुबंदीबाबतची बैठक हिवाळी अधिवेशन पूर्वी होणार
चंद्रपूर – विदर्भातील काही भागात पूर परिस्थिती बघता आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार हे पूरग्रस्त भागात जाऊन पाहणी करीत आहे, त्यामुळे 2 सप्टेंबरला मुंबई मध्ये उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणारी बैठक रद्द करण्यात आली होती, आता ही बैठक हिवाळी अधिवेशन पूर्वी होणार असल्याची माहिती मिळाली आहे.


चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याची दारूबंदी हटविण्याबाबत या बैठकीत निर्णयात्मक चर्चा होणार आहे, याकरिता चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील दारू विक्रेते मुंबईत ठाण मारून बसले आहे.

या बैठकीची तारीख लवकर कळविण्यात येणार असल्याचे लेखी पत्र सुद्धा संबंधित मंत्री व विभागांना देण्यात आले आहे, आता हिवाळी अधिवेशनपूर्वी दारुबंदीवर निर्णय करून कॅबिनेट बैठकीत प्रस्ताव मंजूर करून राज्यपाल यांच्याकडे पाठविला जाणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies