Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

कोरोना नावाचा "आजार" ! त्याचा मांडून ठेवला "बाजार" !!A "disease" called corona!Put it on the "market" !!
संपूर्ण भारतामध्ये कोरोना या महामारीने (?) थैमान घातले आहे, काही ठिकाणी परिस्थिती सुधारत आली आहे, तर काही ठिकाणी ही परिस्थिती फार विदारक आहे. सध्या चंद्रपूर जिल्ह्याची स्थितीही विदारक आहे, रोज मिळणाऱ्या बाधितांची संख्या मोठी आहे तर सगळ्यात घातक बाब म्हणजे मृतकांची संख्या धडकी भरवणारी आहे. प्रशासन, आरोग्य प्रशासन यांनी वारंवार चाचणीसाठी समोर येण्याचे चंद्रपूर जिल्हावासियांना आव्हान केले आहे परंतु आरोग्य यंत्रणेवर सामान्य जणांचा विश्वास नसल्यामुळे लोक स्वतःहून चाचणीसाठी सामोरे येत नाही, ही स्थिती जिल्ह्यात बघायला मिळत आहे. त्यातच कहर म्हणजे काही दिवसापूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री व प्रशासनाने खाजगी रुग्णालये कोविड रुग्णांसाठी खुले करण्याचे जाहिर केले तर रुग्णालयांनी बाधितांवर उपचार करावे, असे कडक निर्देश दिले परंतु आता खाजगी रुग्णालयांमध्ये बेड चार्ज सहित लाखो रुपये भरण्याच्या सूचना करणारे दरपत्रक (रेटकार्ड) रुग्णालयाच्या बाहेर लावण्यात आले असल्यामुळे सामान्यजनांच्या हृदयात धडकी भरली आहे. "कोरोना नावाचा "आजार" ! त्याचा मांडून ठेवला "बाजार" !!" अशी हृदयद्रावक स्थिती या जिल्ह्यामध्ये आहे.

कोरोनाबाधित सौम्य लक्षणे किंवा त्याहून जास्त लक्षणे असणाऱ्या रुग्णालाच आम्ही उपचारार्थ दाखल करून घेऊ, रुग्णाची प्रकृती गंभीर झाल्यास किंवा आॅक्सिजनची गरज भासल्यास शासकीय रुग्णालयात उपचारार्थ घेवून जाणे बंधनकारक राहील, रुग्ण भरती करतानाच दहा दिवसांचे पैसे म्हणजे लाख-दीड लाख रुपये अगोदर जमा करावे लागेल, अशी नियमावलीच शहरातील खासगी डॉक्टरांनी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर लावल्याने कोरोनाबाधित रुग्ण तथा नातेवाईकांच्या उरात धडकी भरली आहे.
या शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वैद्यकीय महाविद्यालय तथा जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतलेल्या खासगी रुग्णालयातही करोनाबाधितांना जागा मिळत नसल्याने गोंधळ उडाला आहे.अशातच जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी पुन्हा काही खासगी रुग्णालये कोविड-१९ बाधितांसाठी सक्तीने घेतली आहेत. ज्या खासगी रुग्णालयात बाधितांना दाखल केले जात आहे, त्यांनी कोविड रुग्ण व नातेवाईकांसाठी सूचना फलक रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशव्दारावर लावला आहे.

खाजगी दवाखाने कोविड सेंटरसाठी घेतल्यामुळे दवाखान्यातील बरेचशे कर्मचारी काम सोडून गेले आहेत. व्हेंटीलेटर, आॅक्सिजन सिलिंडर व इतर साहित्य घ्यायला पैसे लागतात. त्यामुळे अ‍ॅडव्हान्स पैसे मागितले जातात. शासनानेच आकारून दिलेल्यानुसार शुल्क घेतले जात आहे. अशी भूमिका खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांनी घेतली आहे. 
कुठल्याचं विभागाचे कुठल्याचं विभागात सामंजस्य नसल्याचे आज चंद्रपूर जिल्ह्यातील चित्र आहे. बाधित यांमध्ये हे भीतीचे वातावरण पसरले असून शासकीय कोबिर रुग्णालयावर जनतेचा विश्वास राहिला नाही. दवाखान्यात जाण्यापेक्षा घरीच मरणे बरे या मन:स्थितीमध्ये सामान्य जनता होरपळून गेली आहे. रोजगार हिरावला आहे बेरोजगारी आ वासून उभी आहे सामान्य देण्याच्या मूळ प्रश्नाकडे शासनाचे व प्रशासनाचे लक्ष नाही ही अर्ध मृत्यूच्या स्थिती आज जनता जीवन जगत आहे परंतु जनतेच्या दैनंदिन जीवनाकडे दुर्लक्ष करून "कोरोना नावाचा आजाराचा, आज बाजार मांडून ठेवला आहे!!." अशी ओरड आज सामान्यतः जनता करून राहिली आहे, ही फार भयानक बाब आहे याकडे त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies