शुक्रवारी रुग्णांचा आकडा ४ हजार ६६२ वर गेला.वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हा आकडा वाढीवरच आहे. जनसंपकार्तून कोरोनाचा प्रसार गतीने होत आहे. चंद्रपूर आणि बल्लारपूर शहरात चार दिवसांचा जनता कर्फ्यू सुरू आहे. याचा काही परिणाम दिसून येतील, परंतु त्यानंतर नागरिकांनी मास्क न लावता बाहेर पडणे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळले नाही तर कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढतील. या वाढत्या रुग्णांसाठी खाटांची व्यवस्था करण्याचे मोठे आव्हान जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणेपुढे निर्माण झाले आहे. चंद्रपूरात सामान्य रुग्णालय व शासकीय वेद्यकीय महाविद्यालयांमध्ये वेंटीलेटर आॅक्सिजनची व्यवस्था आहे. या ठिकाणी गंभीर स्थितीतील कोरोना रुग्णांना ठेवले जात आहे. पंरतु येथील क्षमतेपेक्षा रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे चंद्रपूरातील सुविधा असलेल्या काही खासगी रुग्णालयांचेही कोविड केअर सेंटरमध्ये रुपांतरीत करण्यात आले. ही रुग्णालयेही फुल्लं झाल्याने बेडसाठी कोरोना रुग्णांची धडपड सुरू झालेली आहे. नव्या रुग्णांसाठी सोईयुक्त रुग्णालये शोधणे जिल्हा प्रशासनापुढे मोठे आव्हान आहे.
कारोनाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. यावर मात करण्याचे प्रयत्न सुरू आहे. आता नागरिकांची स्वत:ची काळजी घेतली नाही तर ही स्थिती हाताबाहेर जायला वेळ लागणार नाही. सर्व सोइंर्नी युक्त अशा पाचशे बेडची व्यवस्था करण्याचे काम गतीने सुरू आहे. हे रुग्णालय सुरू झाल्यास स्थिती आटोक्यात येईल, अशी अपेक्षा आहे.
- डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक, चंद्रपूर.