घुग्घुस येथील गांधी चौकातील हनुमान मंदिरात आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या निरोगी आरोग्यासाठी चंद्रपुर भाजपा जिल्हाअध्यक्ष देवराव भोंगळे यांनी प्रार्थना केली.
काही दिवसापुर्वीच मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना कोरोना संसर्ग झाला. त्या अनुषंगाने घुग्घुस भाजपा पदाधिका-यांनी घुग्घुस येथील गांधी चौकातील हनुमान मंदिरात जाऊन प्रार्थना केली.
चंद्रपुर भाजपा जिल्हाअध्यक्ष देवराव भोंगळे यांनी हनुमान मंदिरात आरती केली तसेच हनुमान चालीसाचा पाठ करण्यात आला.
यावेळी चंद्रपुर भाजपा जिल्हाअध्यक्ष देवराव भोंगळे हे म्हणाले की मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी कोरोना आजारावर मात करावी त्यांचे आरोग्य चांगले राहावे व लवकारात लवकर प्रकॄतीत सुधारना व्हावी आणी पुन्हा ते लोकांच्या सेवेत रुजु व्हावे यासाठी भाजपाच्या वतिने जिल्हाभर प्रार्थना केली जात आहे. लोकनेते मा आ सुधीरभाऊ मुनगंटीवार कोरोना महामारीत सहा महिण्यापासुन जिल्ह्यातील गरिब, गरजू लोकांना मदत करीत उपाय योजना केली. गोर गरीबांना धान्य किट, मास्क, जेवण सॅनिटाईजर वाटप करुन समाजाच्या गरिब वर्गाला मदतीचा हात दिला. त्यांना प्रभू स्वस्थ व उदंड आयुष्य देवो.
यावेळी भाजपा शहराध्यक्ष विवेक बोढे, वाहतुक आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद चौधरी, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश बोबडे, मनोज पराशर, अनिल नित, दिपक तंबाखे, श्रीनीवास कोत्तुर, पंकज रामटेके, उमेश दडमल उपस्थित होते.