Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

घग्घूस येथे मा. सौ. सपणाताई सुधीरजी मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त मास्क वाटप
आदरणीय सुधीरभाऊला सेवाकार्यात नेहमी खंबीरपणे साथ देणाऱ्या सपना वहिनींच्या वाढदिवसानिमित्त चंद्रपूर जिल्ह्यात 1 लाख 51 हजार मास्कचे वाटप संपन्न. - देवराव भोंगळे

घुग्घुस येथे मा. सपनाताई सुधीरजी मुनगंटीवार यांच्या वाढदिवसा निमित्त घुग्घुस येथील बाजारात भाजिपाला, फळ विक्रेते यांना दहा हजार मास्कचे वाटप भाजपा जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराव दादा भोंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
घुघुस शहरातील बाजारात सर्व पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी सर्व व्यापाऱ्यांना व गिर्‍हाईकांना कोरोना रोगाबद्दल व घ्यावयाच्या काळजीबद्द्दल माहिती दिली. मास्क देत असताना जनजागृती करण्यात आली.

या प्रसंगी भाजपा शहराध्यक्ष विवेक बोढे, महिला व बालकल्याण सभापती सौ. नीतुताई चौधरी, पंचायत समितीचे उपसभापती निरीक्षण तांड्रा, माजी जि.प. सदस्य चिन्नाजी नलभोगा, भाजपा नेते विनोद चौधरी, ग्रामपंचायत सदस्य श्रीनिवास इसारप, साजन गोहने, प्रकाश बोबडे, सुचीता लुटे, वैशाली ढवस, पुजा दुर्गम, भाजपा युवामोर्चा अध्यक्ष अमोल थेरे, भाजपा ट्रान्सपोर्ट युनियन अध्यक्ष अजय आमटे, मल्लेश बल्ला, बबलु सातपुते, मधुकर धांडे, प्रविण सोदारी, पंकज रामटेके, सुरेंद्र भोंगळे, गुड्डु तिवारी, तुलसीदास ढवस, धनराज पारखी, अजगर खान, विनोद जिंजर्ला, कोमल ठाकरे उपस्थित होते.

Post a comment

0 Comments