चंद्रपुरातील सराफा व्यवसायिकांनी जाहीर केला 8 दिवसांचा लॉकडाऊनचंद्रपूर – जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, आज जिल्ह्यात कडक लॉकडाऊनची गरज आहे, परंतु केंद्राने याबाबत परवानगी नाकारल्याने आता चंद्रपुरात जनता कर्फ्यु करणार असल्याचे पालकमंत्र्यांनी जाहीर केले.
हा जनता कर्फ्यु नागरिकांच्या सहकार्याने केल्या जाणार आहे.
परंतु कोरोनाच्या या लढाईत आज चंद्रपुरातील सराफा व्यवसायिकांनी स्वतः 8 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करत दुकाने बंद ठेवण्याचा सर्वानुमते निर्णय करण्यात आला आहे.हा लॉकडाऊन 9 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर पर्यन्त असणार असल्याची माहिती मिळाली आहे.

सराफा व्यापाऱ्यांनी स्वतः लॉकडाऊन जाहीर केल्याने काही प्रमाणात नागरिकांची होणारी गर्दी आटोक्यात येणार.

Post a comment

0 Comments