Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

गडचांदूर 4 तर भद्रावतीत 5 दिवसांचा जनता कर्फ्यु




गडचंदुर सह भद्रावतीत जनता कर्फ्यू

गड़चांदूर: चंद्रपुर जिल्ह्यात कोरोना चे रुग्ण वाढत आहे व मृत्यू ची संख्या वाढत आहे त्यामुळे चंद्रपुर व बल्लारपूर येथे चार दिवसांचे व्यापारांनी व प्रशासनाने कडकडीत बंद पाळण्यात आले होते. शासन व प्रशासन ला सहकार्य म्हणून जनता कर्फ्यू चे आयोजन गडचांदूर शहर व्यापारी असोसिएशन ने केले आहे.गडचांदूर शहरात दिवसेंदिवस कोरोना बाधीतांची संख्या वाढत आहे शहरातील दोन प्रतिष्ठीत व्यक्ती कोरोना ने मृत्यू झाले आहे त्यामुळे संक्रमण व रुग्णाची संख्या कमी करण्यासाठी कोरोणा विषाणूची साकळी तोडणे गरजेचे आहे. हा उद्देश डोळ्या समोर ठेवून गडचांदूर शहरातील गडचांदूर शहर व्यापारी असोसिएशन ने गडचांदूर शहरात गुरुवार दि. 17 सप्टेंबर ते रविवार दि. 20 सप्टेंबर पर्यंत स्वयंस्फूर्तीने ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात गडचांदूर शहर व्यापारी असोसिएशन ने दि. 14 सप्टेंबर रोजी मुख्याधिकारी डॉ विशाखा शेळकी आणि गडचांदूर चे ठाणेदार गोपाल भारती यांना एक निवेदन सादर करून गडचांदूर व्यापारी असोसिएशन जनता कर्फ्यू पाळत असल्याचे अवगत केले. तसेच शासन व प्रशासनाला सहकार्य म्हणून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर जनता कर्फ्यू चार दिवसांचा असुन या कालावधीत सर्व दवाखाने, औषधांचे दुकाने, बॅंक व दुधवितरण व्यवस्था सुरु राहणार असून सर्व किराणा दुकान, भाजीपाला व फ्रूट चे दुकाने, पान टपरी, चाय चे दुकाने, फुटपाथवरील दुकाने व इतर सर्व दुकाने बंद राहणार आहे. तरी नगर परिषद गडचांदूर, गडचांदूर पोलीस स्टेशन व जनतेने या जनता कर्फ्यू ला यशस्वी करण्यासाठी कोरोना वायरस ची साखळी तोडण्यास सहकार्य करावे असे आवाहन गडचांदूर शहर व्यापारी असोसिएशन ने एका निवेदनातून केले आहे.

भद्रावती मध्ये चार दिवसाच्या जनता कर्फ्यु

गेल्या काही दिवसांपासून भद्रावती शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून संक्रमण आणि रुग्णांची संख्या कमी करण्याकरीता कोरोना विषाणूंची साखळी
तोडणे गरजेचे आहे.हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून भद्रावती शहरातील समस्त व्यापारी संघटनेने भद्रावती शहरात बुधवार दि.१६ सप्टेंबर ते रविवार दि.२० सप्टेंबर पर्यंत स्वयंस्फुर्तीने 'जनता कफ्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला आहे.
यासंदर्भात व्यापारी संघटनेने दि.१४ सप्टेंबर रोजी
नगराध्यक्ष अनिल धानोरकर,मुख्याधिकारी सूर्यकांत
पिदुरकर, तहसीलदार महेश शितोळे आणि भद्रावती पोलिस
स्टेशनचे प्रभारी ठाणेदार सुधीर वर्मा यांना एक निवेदन
सादर करुन भद्रावतीत व्यापारी संघटना जनता कफ्फू
पाळत असल्याचे अवगत केले.तसेच शासन व प्रशासनाला
सहकार्य म्हणून वरील उपक्रमाचे आयोजन करण्यात आले
आहे.सदर जनता कफ््यू ५ दिवसांचा असून त्यानंतर
वाढवायचा की थांबवायचा याचा निर्णय त्यावेळेसच्या
परिस्थितीनुसार घेण्यात येणार आहे. निवेदनाची प्रतिलिपी
आ.प्रतिभाताई धानोरकर यांना सादर करण्यात आली आहे.
नगराध्यक्ष आणि ठाणेदारांना निवेदन सादर करतेवेळी
प्रकाश पाम्पट्टीवार, प्रवीण महाजन,निलेश गुंडावार, बाळू
गुंडावार,अब्बास अजानी, संतोष आमने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies