या निर्णयानुसार चंद्रपूर शहरातील सर्व दवाखाने, मेडिकल व वैद्यकीय व्यवस्था सुरू राहणार आहेत. या जनता कर्फ्यूला सर्व जनतेने सहकार्य करून यशस्वी करावे, असे आवाहन करण्यात येत आहे
कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण वाढले
अनेक दिवसांपासून कोरोनाच्या काळ्या छायेत नसलेला चंद्रपूर जिल्हा आता समस्याग्रस्त होत आहे. नागपूर, पाठोपाठ आता चंद्रपूर जिल्ह्यातही कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला पायबंद घालणे गरजेचे अहे. त्यासाठी नियम कठोर करणे आवश्यक आहे. म्हणूनच जनता कर्फ्यूचे आवाहन करण्यात येत आहे.
सुरू राहतील:- सर्व रुग्णालय, मेडिकल, कृषी केंद्र, एमआयडीसीतील सर्व फॅक्टरी, शासकीय कार्यालय, सर्व बँक, दूध वितरण (घरपोच) वृत्तपत्र, पेट्रोल पंप या सर्व बाबी सुरु राहतील.
बंद राहतील:- सर्व भाजीपाला दुकाने, फळे दुकाने, किराणा दुकाने, सर्व व्यापार पेठ, पानठेले, चहा टपरी, पुथपाठ वरील गाडी या सर्व बाबी बंद राहतील.
25 सप्टेंबर ते 01 ऑक्टोंबर पर्यंत जनता कर्फ्यू असणार आहे. विनाकारण घराबाहेर पडू नये. या जनता कर्फ्यू ला सर्वांनी सहकार्य करावे. सर्वांनी मास्क चा वापर करावे वेळोवेळी आपले हात स्वच्छ धुवावे, सोशल डिस्टंसिंग चे पालन करावे. असे आव्हान जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
0 Comments