Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

गोसीखुर्द धरणाचे 17 दरवाजे उघडले



जिल्हा प्रशासनातर्फे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

चंद्रपूर दि.10 सप्टेंबर : गोसीखुर्द धरणाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने गोसेखुर्द धरणाचे एकूण 17 दरवाजे 0.50 मीटरने उघडण्यात आले आहे. त्यामुळे सावली, ब्रह्मपुरी, पोंभूर्णा, गोंडपिंपरी, मुल आदी तालुक्यातील नदी काठावरील गावातील नागरिकांना व प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत.

गोसीखुर्द धरणाचे 17 दरवाजे उघडल्याने 2067 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तसेच, रात्रभरात पाण्याचा प्रवाह वाढण्याची शक्यता असून 5 ते 10 हजार क्युमेंक्स पर्यंत  विसर्ग वाढू शकतो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies