Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

जिल्हात बाधितांची एकूण संख्या 10009;उपचार सुरु असणारे बाधित 3984 Discharge of 5876 victims so far in Chandrapur district







चंद्रपूर जिल्ह्यातील आतापर्यत 5876बाधितांना डिस्चार्ज


जिल्ह्यात 24 तासात 197 बाधित; एका बाधिताचा मृत्यू

चंद्रपूर, दि. 29 सप्टेंबर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या 24तासात आणखी 197 बाधित पुढे आले आहेत. त्यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या 10 हजार 9 झाली आहे. यापैकी 5 हजार 876 कोरोना बाधितांना आतापर्यंत बरे झाल्यामुळे सुटी देण्यात आली असून 3हजार 984 कोरोना बाधितांवर सध्या उपचार सुरू आहेत.

आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, 24तासामध्ये एका कोरोना बाधिताचा मृत्यू झालेला आहे. यामध्ये तुकुम, चंद्रपूर येथील 45 वर्षीय पुरुष बाधिताचा  समावेश आहे. या बाधिताला 28 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. कोरोनासह श्वसनाचा आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथे मृत्यू झालेला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 149 कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यापैकी, चंद्रपूर 140, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली तीन, यवतमाळ तीन तर भंडारा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परीसरातील 99 , पोंभूर्णा तालुक्यातील दोन, बल्लारपूर तालुक्यातील 12, चिमूर तालुक्यातील पाच, मुल तालुक्यातील पाच, गोंडपिपरी तालुक्यातील तीन, ब्रह्मपुरी तालुक्यातील आठ,  नागभीड तालुक्‍यातील सहा, वरोरा तालुक्यातील 22, भद्रावती तालुक्यातील पाच, सावली तालुक्यातील दोन,  सिंदेवाही तालुक्यातील चार, राजुरा तालुक्यातील 21, गडचिरोली येथील तीन असे एकूण 197  बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहर व परिसरातील बाबूपेठ, बालाजी वार्ड, महेश नगर, चोर खिडकी परिसर, समता चौक परिसर, दुर्गापुर,जगन्नाथ बाबा नगर, शास्त्रीनगर, नगीना बाग, आंबेडकर नगर, सिस्टर कॉलनी परिसर, दाताळा, जटपुरा वॉर्ड,भानापेठ वॉर्ड, विश्वकर्मा नगर, महाकाली वार्ड, कोतवाली वार्ड, बापट नगर, आकाशवाणी रोड परिसर, ओम नगर भिवापुर वॉर्ड या भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:

बल्लारपूर तालुक्यातील भगतसिंग वार्ड, रेल्वे वार्ड, फुलसिंग नाईक वार्ड, शिवाजी वार्ड, गणपती वार्ड, राणी लक्ष्मी वार्ड, कन्नमवार वार्ड परिसरातून बाधित पुढे आले आहे.

राजुरा तालुक्यातील नेहरू चौक परिसर, श्रीनिवास कॉलनी परिसर, आंबेडकर वार्ड, देशपांडे वाडी, जवाहर नगर, रामपूर, स्वप्नपूर्ती नगर, रामनगर कॉलनी परिसर, सोनिया नगर, गौरी कॉलनी परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

वरोरा तालुक्यातील ज्योतिबा फुले वार्ड, दत्त मंदिर वार्ड, चरुर खटी, कमला नेहरू वार्ड, विनायक लेआउट परिसर, टिळक वार्ड, हनुमान वार्ड, आझाद वार्ड, कॉलरी वार्ड, बावणे लेआउट परिसर, जिजामाता वार्ड परिसरातून बाधित ठरले आहे.

ब्रह्मपुरी तालुक्यातील भवानी वार्ड, कुर्झा वार्ड, संत रवीदास चौक परिसर, शिवाजीनगर, नागेश्वर नगर, शेष नगर, तोरगाव बुज, परिसरातून बाधित ठरले आहे. भद्रावती तालुक्यातील गणपती वार्ड, गुरु नगर,परिसरातून बाधित पुढे आले आहे.

सावली तालुक्यातील चक पिरंजी भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे. सिंदेवाही तालुक्यातील भेंडाळा,भागातून बाधित पुढे आले आहे. नागभीड तालुक्यातील नवखेडा, आदर्श कॉलनी परिसर,सावरगाव परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. चिमूर तालुक्यातील नेरी, माणिक नगर, नेताजी वार्ड, वडाळा पैकु, भागातून बाधित पुढे आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies