केंद्राची परवानगी घेतल्याशिवाय कुठल्याही राज्यात व जिल्ह्यात लॉकडाऊन करू नये !अनलॉक- ४ अशी नुकतीच केंद्र सरकार तर्फे गाईडलाईन जारी करण्यात आली. ज्यात केंद्रीय गृह मंत्र्यालया तर्फे स्पष्टपणे प्रत्येक राज्याला निर्देश देण्यात आले हाेते की, कुठलेही राज्य सरकार किंवा जिल्हा प्रशासन आपल्या मर्जी ने लॉकडाऊन करू शकणार नाही. मात्र चंद्रपुर जिल्हा प्रशासनाच्या वतीने चंद्रपुरात ३ सप्टेंबर पासुन ७ दिवसाकरिता कडक लॉकडाऊन घाेषीत करण्यात आले हाेते. परंतु त्यानंतर मात्र केंद्र सरकारची नवीन गाईड लाईन आल्याने चंद्रपुरात लॉकडावुन हाेईल की नाही हे काही स्पष्ट सांगता येत नाही.

१ ते ३० सप्टेंबर पर्यंत अनलॉक ४ लॉकडाऊन घाेषीत करण्यात आले आहे. चंद्रपुरचे पालकमंत्री विजय वड्डेट्टीवार यांनी वाढत चाललेल्या काेराेना पेंशंटमुळे जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लॉकडाऊन करण्यात येईल या मतावर ठाम दिसताहेत. आता जिल्हा प्रशासन राज्य सरकारच्या परवानगीच्या प्रतीक्षेत आहे. परवानगी मिळाल्यास चंद्रपुर जिल्ह्यात लॉकडाऊन हाेईल अन्यथा लॉकडाऊनला स्थगीत करावे लागणार आहे.

चंद्रपुरातील जनता मात्र लॉकडाऊन हाेईल की नाही या संभ्रमात दिसत आहे. चंद्रपुरात पुन्हा लॉकडाऊन झाल्यास व्यापारी व कामगार वर्गात नाराजीचा सुर दिसुन येताे. आधीच सततच्या लॉकडाऊनमुळे चंद्रपुरकरांचे जगने त्रासदायक झाले असतांना पुन्हा एकदा लॉकडाऊनला समाेर जावे लागेल तर नाही ना ? अशी चिंता समस्त जिल्ह्यातील जनतेला सतावू लागली आहे.

Post a comment

0 Comments