Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

वलनी फाट्याजवळ जवळ भिषण अपघात

राजूभाऊ झोडे यांनी तत्परता दाखवून वाचविले एका युवकाचे प्राण

आज मुल येथून कार्यकर्त्यांसोबतची बैठक पूर्ण करून परत चंद्रपूरकडे येत असताना *राजूभाऊ झोडे यांना वलनी फाट्याजवळ दोन युवक रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेले दिसले. दोन्ही युवक दुचाकीने प्रवास करतांना समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. त्यातच एकाचा जागीच मृत्यू झाला तर एकटा रस्त्यालगतच तडफडत होता. जवळपास अर्धा तास होऊनही कोणीही त्या जखमी युवकांच्या जवळ जात नव्हते. राजूभाऊ झोडे यांना समोर पडलेले जखमी युवक दिसताच त्यांनी आपले वाहन थांबविले व दोघांनाही हात लावून बघितले असता एकाचा जागीच मृत्यू झाला होता तर एक युवक बेशुद्ध अवस्थेत गंभीर जखमी होता. राजूभाऊंनी क्षणाचाही विलंब न करता तात्काळ त्यांनी आपल्या वाहनात स्वतःच्या हाताने उचलून ठेवले व लगेच जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे उपचारासाठी दाखल केले. स्वतःच्या हाताने त्या जखमी युवकाला स्ट्रेचरने ढकलत आणून आणि तेथील कर्मचाऱ्यांना तात्काळ बोलवून त्या जखमी युवकावर उपचार करायला लावले. जर दहा ते पंधरा मिनिट उशीर झाला असता तर युवक दगावला असता असे तेथील कर्मचाऱ्यांनी राजूभाऊंना सांगितले. जखमी युवकाला उपचार होईपर्यंत त्या ठिकाणी राजूभाऊ व त्यांचे सहकारी प्रशांत उराडे व गुरु कामटे स्वतः उपस्थित होते. जखमी युवक मंदा तुकुम, तालुका मूल जिल्हा चंद्रपूर येथील असल्याची खातरजमा राजूभाऊ झोडे यांनी स्वतः केली. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांकडून युवकाच्या नातेवाईकांशी संपर्क करायला सांगितला व नातेवाइकांना माहिती मिळाली असे कळताच व एक दोन नातेवाईक रुग्णाच्या जवळ आल्यानंतर राजूभाऊ झोडे यांनी त्या जखमी युवकाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवून बाहेर आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies