Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

वनसडीत तीन दिवसांचा जनता कर्फू व्यापारी व प्रशासनाचा निर्णय
वनसडी:- वनसडी येथे कोरोनाचे १२ रूग्ण आढळून आले व कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता 3 दिवसांचा जनता कर्फू जाहीर करण्यात आला . प्रशासन व व्यापारी यांनी जनता कर्फू ठेवण्याचे जाहीर केले .
वनसडी येथे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार , तहसीलदार महेंद्र वाकलेकर ,तालुका आरोग्य अधिकारी डॉ स्पनिल टेंभे, पोलीस निरीक्षकगुरनुले कोरपना पंचायत समितीच्या उपसभापती सिंधूताई आस्वले, यांच्या उपस्थितीत मिटिंग घेण्यात आली व कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी वनसडी गावात प्राथमिक उपाय म्हणून जनता कर्फू लावण्याची सूचना तहसीलदार यांनी सुचवली त्या अनुषंगाने दि 28 आगस्ट ते 30 आगस्ट पर्यंत जनता कर्फू ठेवण्याचे ठरले

याप्रसंगी वनसडी च्या सरपंच ललिता गेडाम , उपसरपंच सुधाकरराव पिंपळकर , राजाबाबू गलगट ,ग्रामसचिव धवने साहेब, पोलिस पाटील सौ संध्या करीये भास्कर जोगी ग्रामपंचायत सदस्य , व्यापारी श्री बाळकृष्णजी कोमावार , श्री रामभाऊजी शेंडे , इरफान शेख ,सुधाकरराव आस्वले, गणपत ताजने , लहुजी क्षीरसागर , विनोद आस्वले , सुरेश अण्णा, अशोक कापसे , नौशाद अली , दीपक बोढे इत्यादी व्यापारी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies