युवासेना जिल्हा समन्वयक इंजि. निलेश बेलखेडे यांचा शैक्षणिक उपक्रम -४० गरिब,गरजू विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप


गरिब गरजू मदतगार, विद्यार्था, युवा वर्ग यांना मदतीचा हात देण्यास सदैव तत्पर अशे आपल्या सामाजिक कार्यासाठी ओळखले जानारे चंद्रपुर राजकारणातले युवा नेत्रुत्व युवासेना जिल्हा समन्वयक इंजि. निलेश बेलखेडे यांनी मे महिन्यात कोरोना मुळे आर्थिक संकटात असलेल्या पाल्यांना एक मदत म्हणून त्यांच्या मुलांना संपूर्ण शैक्षणिक साहित्य देण्याचे आश्वासन देऊन मानसिक , आर्थिक दिलासा त्यांना दिला होता आज त्याच आश्वासनाची पुर्तता म्हणून, उडिया मोहल्ला,रेल्वे स्टेशन, दुर्गापूर, सिनाळा ई. विविध ठिकाणी जाऊन ते तब्बल ४० विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करून प्राध्यापक असलेले निलेश बेलखेडे यांनी त्यांच्या चेहर्यावर आनंद देण्याचे कार्य करून त्यां विद्यार्थ्यांना शैक्षणिक रित्या सक्षम होण्याकरिता तसेच त्यांच्या पालकांना  गरिबीमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणापासुन वंचित ठेऊ नये,काहीना काही मार्ग काढून त्यांना सुशिक्षीत  करावे असे मार्गदर्शन केले सोबतच चंद्रपुर युवासेना, शिवसेना सदैव या पुण्याच्या कार्यात आपल्या सोबत आहे असा विश्वास त्यांना दिला. शिक्षणामुळे चांगली वैचारिकता वाढून वैयक्तिक व सामाजिक प्रगती होण्यासाठी मदत होत असून राष्ट्र हित करीता हेच योगदान अतुलनीय ठरित असते असे विचार यावेळी त्यांच्या मार्फत मांडण्यात आले.सदर उपक्रम जिल्हा युवासेना विस्तारक मा. नित्यानंद त्रिपाठीजी, शिवसेना जिल्हा प्रमुख संदिपजी गिर्हे,महानगर प्रमुख प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिवसेना ता. प्रमुख संतोष नरूले, उपशहर प्रमुख सुरेश नायर,युवासेना शहरप्रमुख अक्षय अंबिरवार,युवासेना चिटणीस तालूका सागर तुरक, अश्विन देवतळे,जयेश नांढा, सुरज शेंडे, मनोज इटकर,यांची उपस्थितीत संपन्न झाला

Post a comment

0 Comments