चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेस च्या वतीने रक्षाबंधन
चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेस च्या वतीने आज दिनांक ०३/०८/२०२० रोजी शिवानीताई वडेट्टीवार प्रदेश महासचिव यांच्या उपस्थितीत आयोजित रक्षाबंधन / राखीच्या निमित्ताने समाजासाठी आपली भूमिका बजावताना अनेकदा पोलिसांना आपल्या आप्तस्वकीयांना वेळ देणे शक्य होत नाही. त्यातचं रक्षाबंधनासारखे महत्वपूर्ण सण देखील त्यांना साजरे करता येत नाही. आणि यावर्षी तर कोरोणा विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्या आठेक महिन्यांपासून पोलीस बांधव नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी घेण्यासाठी रस्तोरस्ती दिवसरात्र उभे आहेत.
अशा पोलीस बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करता यावी. आणि त्यांच्या शूरतेला सलाम करता यावे. यासाठी प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस कु. शिवाणी विजय वडेट्टीवार यांनी आज रक्षाबंधन व नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांसह अनेक पोलीस कर्मचार्‍यांना तसेच वाहतुक नियंत्रण शाखेच्या पोलीस बांधवांना राखी बांधली. यासोबतचं, त्यांना सुरक्षाकीट म्हणून माॅस्क व सॅनिटयझरचेही वाटप केले.

यावेळी जिल्हाध्यक्ष हरीश कोत्तावार, महिला काँग्रेस शहर अध्यक्षा सुनिताताई अग्रवाल, माजी जिल्हाध्यक्षा अश्विनीताई खोब्रागडे, प्रदेश सचिव सचिन कत्याल, रुचित दवे, जिल्हा महासचिव रमीज़ शेख, जिल्हा महासचिव इमरान खान, विधानसभा अध्यक्ष राजेश अडुर, ब्रम्हपुरी विधानसभा अध्यक्ष सवप्निल कावळे, कुणाल चहारे, भानेश जनगम, शितल कातकर, पूजा मडावी, अपेक्षा वानखेडे, स्वेता तोतडे, प्रियंका देशभ्रतार, प्रकाश देशभ्रतार, प्रणय जाधव, सुफियान पठान, अनिल कोंड्रा व सर्व जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..

Post a comment

0 Comments