Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

गडचांदूर न.प. कर्मचाऱ्यांच्या दिरंगाईमुळे कोरोनटाईन असलेल्या महिलेची प्रकृती गंभीर !
दोषींवर कारवाई करा, जिल्हाधिकारी यांचेकडे सामाजिक कार्यकर्ते वरभे यांची तक्रार !

आस्वले इन्स्टिट्यूशनल कोरंटाईन सेंटर गडचांदूर येथे उपचारार्थ होती महिला !

गडचांदूर : गडचांदूर येथील इन्स्टिट्यूशनल कोरंटाईन महिलेस डेंगू होऊन सध्या त्यांची मृत्यूशी सुरु आहे. त्यांना चंद्रपूर येथे रूग्णालयात हलविण्यात आले असून गडचांदूर नगर परिषद चे निष्काळजीपणा मुळे ही वेळ institutional quarantine असलेल्या महिलेवर आली असून, सदर गंभीर प्रकरणाची दखल घेऊन न.प. च्या दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार गडचांदूर चे सामाजिक कार्यकर्ते व माजी विशेष कार्यकारी अधिकारी दिपक महादेवराव वरभे यांनी चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
निवेदनात नमुद केल्याप्रमाणे गडचांदूर येथील रहिवासी असलेली एक 60 वर्षिय महिला उत्तर प्रदेश
वरून दि २८/०७/२०२० रोजी परत आल्या व आपल्या पतीसह नगर परिषद गडचांदूर आस्वले इन्स्टिट्यूशनल कोरंटाईन सेंटर येथे त्यांना कोरंटाईन करण्यात आले. त्यांचा स्वब हा दिनांक १/०८/२०२० ला घेण्यात आला व त्याची रिपोर्ट हि दि २/०८/२०२० रोजी आली . परंतु नगर परिषद गडचांदूर येथील संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांना नियमानुसार दि २/०८/२०२० ला डिस्चार्ज दिला नाही. त्या नंतर सदर महिलेची दि ४/०८/२०२० ला दुपारी प्रकृती खराब झाली. त्या बाबत उपस्तित कर्मचाऱ्यांना महिलेच्या पति नी तोंडी माहिती दिली कि माझ्या पत्नीला जोराचा ताप आला आहे आणि त्यांचे डोके फार दुखत आहे. असे वारंवार सांगूनही त्या बाबत कोणीही काही केले नाही. नगर परिषद
चे उपस्थित कर्मचारी वारंवार उडवाउडवी चे उत्तर देत राहिले. ते डॉक्टरांचे काम आहे आमचे नाही असे सांगण्यात आले .
नगर परिषद गडचांदूर येथे सध्या माणिकगड (अल्ट्रा टेक ) ची ऍम्ब्युलन्स उपलब्ध असून त्याने सदर महिलेला
तातडीने ग्रामीण रुग्णालय येथे तपासणी करीता हलविणे आवश्यक असतांनी नगर परिषद ने कोणतीही कार्यवाही केली नाही. हतबल वृद्ध दाम्पत्य उशिरा रात्रौ पर्यंत वैद्यकीय उपचाराकरिता विनवणी करीत राहिले . अखेर रात्रौ ११ वाजता ग्रामीण रुग्णालय येथील डॉक्टरांनी IQ मध्ये येऊन सदर महिलेवर प्राथमिक उपचार केले आणि इंजेक्शन दिले. त्या नंतर दि ५/०८/२०२० रोजी त्या महिलेची नगर परिषद गडचांदूर तर्फे तात्काळ सुट्टी करण्यात आली. ६/०८/२०२० राजी सदर महिला यांची प्रकृती त्यांनी गडचांदूर येथे डॉक्टर ला दाखविली. ७/०८/२०२० रोजी डेंगू झाले असल्याचे संशयावरून त्यांना ग्रामीण रुग्णालयात तपासणी करीता गेले असता ८/०८/२०२० ला डेंग्यू झाल्याचे निदान होऊन त्यांना तात्काळ चंद्रपूर येथील रुग्णालयात भरती करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती अत्याधिक खराब असून त्या मृत्यूशी झुंज देत आहे.
सदर सर्व प्रकार हा नगर परिषद चें अधिकारी व कर्मचारी यांचे निष्काळजीपणामुळे झाला असून इन्स्टिट्यूशनल कोरंटाईन सेंटर येथे भरती लोकांना डेंगू सारखा जीवघेणा आणि खर्चिक बिमारी होणे हे प्रकार जीवाशी खेळण्यासारखा असून त्याची तात्काळ गंभीर दाखल आपण घेणे आवश्यक आहे. सदर इन्स्टिट्यूशनल कोरंटाईन सेंटर वर सुविधांचा अभाव असून महिला व पुरुषांना एकत्र हॉल
मध्ये व्यवस्था केली आहे. वास्तविक पाहता महिला व पुरुषांची व्यवस्था वेगळी असायला हवी. अस्वछता आणि मच्छराचे प्रमाण याठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे, आश्रय सुविधांचा ही याठिकाणी अभाव आहे. मास्क दिल्या जात नाही सोबतच या इन्स्टिट्यूशनल कोरंटाईन सेंटर वर जेवनाबाबत हि बऱ्याच तक्रारी असून बरेच लोक
हे स्वतः चे जेवण आपल्या घरूनच बोलावीत असतात. परंतु त्यांचे जेवणाचे बिल कर्मचारी संगनमत करून काढतात.
संबंधित कर्मचारी हे IQ मध्ये आलेल्या लोकांना नेहमीच मानसिक त्रास देत असतात. तक्रार करायची आहे तर
कलेक्टर कडे जा आमचे कुणी वाकडे करीत नाही असल्या प्रकारची भाषा वापरली जाते. सदर प्रकरणाची आपण IQ मध्ये तेव्हा भरती लोकांचे माझ्या समक्ष बयान घेऊन तात्काळ उच्चस्तरीय चौकशी करावी आणि दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी गडचांदूर चे सामाजिक कार्यकर्ते व माजी विशेष कार्यकारी अधिकारी दिपक महादेवराव वरभे यांनी चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies