कर्नाटक एम्टाचे जंगल बनले प्रेमी युगलांचे मौजमजा केंद्रप्रशासनाचे दुर्लक्ष,अनूचित घटना घडण्याची शक्यता

भद्रावती :- तालुक्यातील बरांज (मो) येथील कर्नाटक एम्टा या कोळसा उत्खनन करणाऱ्या कंपनीचे जंगल प्रेमी युगुलांचे मौजमजा केंद्र बनले असून प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने एखाद्या वेळेस अनुचित घटना घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.भद्रावती शहरापासून 4 कि.मी.अंतरावर कर्नाटक एम्टा कंपनी च्या 34 हेक्टर जागेवर महाराष्ट्र वनविकास महामंडळा तर्फे सन 2011-12 व 2012-13 या दोन वर्षांत नर्सरी लावण्यात आली.नर्सरीत नीलगिरी, साग ,विलायती चिंच,ग्रीनशिडीया आणि इतर वृक्षची लागवड करण्यात आली. या वृक्षाचे रक्षण आणि संर्वधन करण्याकरिता महाराष्ट्र वनविकास महामंडळ चौकीदार नेमून त्या वृक्षाचे जतन केले.मात्र काही वर्षापूर्वी कर्नाटका एम्टा कंपनीचे काम बंद पडले त्यामुळे खदान वाऱ्यावर सोडून कंपनीचे काम अधिकारी निघून गेले.कंपनीची यंत्रसामुग्री अजूनही धूळ खात आहे. त्यामुळे कंपनीचे करोडो रुपयाचे नुकसान होत आहे. तसेच कंपनीला आता कोणीच वाली नसल्यामुळे कंपनी परिसरात कोळसा चोरी, रेती चोरी, प्रेमी युगुलांचे चाळे, पार्ट्या वृक्षतोड आदी गैरप्रकार सुरू झाला आहे.सन 2011-13 पर्यत नर्सरीत लागवट आलेले रोपटे आज वृक्षरुपात डौलाणे उभे आहेत. तसेच त्याच्या असणाऱ्या जुडपी जंगलही वाढलेले आहे. जो पर्यत वनविकास महामंडळाने चौकीदार कर्तव्य बजावत होते. तो पर्यंत कोणतेही अवैध येथे घडत नव्हते.मात्र कर्नाटका एम्टाने महाराष्ट्र वनविकास महामंडळाने आपले काम पूर्ण करून दिल्यानंतरही पैसे दिले नाही.त्यामुळे चौकीदारांनी आपले कर्तव्य बजावणे बंद केले. परिणामी ‘त्या’ नर्सरीवर आता ना कंपनीचे नियंत्रण आहे.ना वनविकास मंडळाचे नियंत्रण आहे. या नगरीतील वृक्ष मोठे झाल्याने नर्सरीला नैसर्गिक सौंदर्य लाभले आहे. निसर्गरम्य ठिकाण म्हणून या नर्सरीकडे पाहिले जाते. त्यामुळेच वरोरा भद्रावती ,चंद्रपूर,कोंढा माजरी आणि नर्सरीच्या आजूबाजूच्या खेड्यातील प्रेमीयुगुल रोज या नर्सरीत येऊन झाडांच्या व झुडपांच्या आडोनाशे अश्लीस चाळे करीत असतात.यात तरुण तरुणीपासून अल्पवहिन आणि बुजुर्ग महिला पुरुषांचाही समावेश आहेत. विशेष म्हणजे या जंगलरूपी नारारीत पट्टेदार वाघ ,बिबट, मोर, डुक्कर ,रोही, हरीण, इत्यादी वन्यप्राण्याचा संचार असतो. काही दिवसांपूर्वीच एका गुरख्याच्या गायी वाघाने मारल्याचा घटना घडल्या आहेत. या प्रेमी युगुलांवर केव्हा वाघाचा हल्ला होईल आणि साप विंचू यासारखे प्राणी त्यांना केव्हा दंश करतील याचा नेम नाही. तसेच दारू, गांजा ,सिगारेट, इत्यादी मादक पदार्थाचे करणारे युवक येथे यवून मस्त आपला शौक पूर्ण करतात. तर नागरिक या नर्सरीतील वृक्षाची मोठया प्रमाणात कत्तल करतात.ही नर्सरी आता अवैध धंद्याचे प्रमुख ठिकाण बनली आहे. प्रशासनाने आणि लोकप्रतिधींने लक्ष दिले नाही तर वृक्ष कटाई होऊन शासनाचे मोठे नुकसान होणार आहे. तसेच अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. या परिसरात अनेकांनी कर्नाटका एम्टाकडून पैसे मिळण्यासाठी आपली छोटी छोटी घरे उभारून ठेवली आहे.मात्र ही घरे प्रेमीयुगुलांसाठी प्रणायलीला करण्यासाठी आश्रयस्थाने बनली आहेत.त्यामुळे प्रशासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष द्यावे परिसरातील सुज्ञ जनतेची मागणी आहे.

Post a comment

0 Comments