Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मुलाची नौकरीत फसवणूक झाल्यामुळे वडिलांची वर्धा नदीत आत्महत्या
चंद्रपूर येथील वेकोली वणी क्षेत्राच्या अंतर्गत येणाऱ्या निलजई खाणीत कार्यरत असणाऱ्या राजु ईश्वर आसेकर (53) रा. घुग्घुस हा इसम बुधवारला सकाळी घरून निघुन गेला.मुलांनी त्यांना दूरध्वनी वरून बोलण्याचा प्रयत्न केला परंतु तें दूरध्वनी उचलत नव्हते यामुळे मयताचा मुलगा निखिल यांनी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली.
लगेच पोलिसांनी मयताचा दूरध्वनी लोकेशन ट्रेस केला असता वर्धा नदीच्या बेलोरा घाट पाणी टाकीजवळ दूरध्वनी, चप्पल, व दोनशे पन्नास रुपये व सुसाईड नोट आढळून आले.यामध्ये मयता कडून मुलांच्या नोकरी करीता एका इसमाला 23 लाख रुपये दिले असून आपली फसवणूक झाल्यामुळे मानसिक त्रासातून आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले आहे.
नदी पात्रात पाणी जास्त असल्यामुळे मृतकाचा शोध लागत नव्हता यामुळे आज चंद्रपूर येथून आपत्ती व्यवस्थापन कडून बोट बोलाविण्यात आली पोलीस रेसक्यू टीमचे अशोक गर्गलवार (बोट चालक) , मंगेश मत्ते, वामन नक्षीने, उमेश बनकर, गिरीश मरापे,दिलीप चव्हाण,समीर चापले, विक्की खांडेकर, सुजित मोगरे, अजित बाहे यांनी आज गुरुवार ला दिवसभर शोध मोहीम राबविली असता सायंकाळी सहा वाजता दरम्यान वर्धा नदीच्या नकोडा घाटा जवळ मयत राजू यांचे शव आढळून आले पोलिसांनी मर्ग दाखल केला असून पुढील तपास घुग्घुस पोलीस करीत आहे.

Post a comment

0 Comments