Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस न्यायालयाने ठोठावला कारावास
पाक्सो अंतर्गत ७ वर्ष कारावासाची शिक्षा आणि ५,०००/-रू दंड, दंड न भरल्यास ०१ वर्ष कारावास, कलम ६ पोक्सो मध्ये १० वर्ष कारावास व ५,०००/-रू दंड, न भरल्यास ०१ वर्ष शिक्षा !

चंद्रपूर : पोलीस स्टेशन गडचांदुर हद्दीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस मंगळवार दि. ०४ आॅगस्ट 2020 रोजी मा. जिल्हा न्यायाधीश २ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश चंद्रपुर वि.द.केदार सर यांनी शिक्षा ठोठावली आहे.

पोलीस स्टेशन गडचांदुर अंतर्गत दिनांक ०१/०४/२०१८ रोजी फिर्यादी ही आपल्या अल्पवयीन मुलीला घरात सोडुन वॉकींग करीता बाहेर गेली होती. या दरम्यान आरोपी नामे अतुल केशव उर्फ किरण मालेकर (१९) रा. गडचांदुर वार्ड क्र. ०६ याने फिर्यादीच्या घरी प्रवेश करून फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीवर लैंगीक अत्याचार केला. अशा फिर्यादीच्या रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन गडचांदुर येथे अप क्र. १४९/२०१८ कलम ३७६(२) (आय) (एफ) भादंवि ३,४,५(एम),६ पाक्सो कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सहकलम गुन्हा तपासात घेतल्यानंतर गडचांदूर चे तत्कालीन पोलीस निरीक्षक विनोद रोकडे यांनी आरोपीस निष्पन्न करून आरोपी विरुध्द सबळ पुराव्यानिशी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.

न्यायालयाचे सुनावणी दरम्यान सदर प्रकरणात न्यायालयाने साक्षीदार तपासले व योग्य पुराव्याच्या आधारे दिनांक मंगळवार दि. ०४ अॉगस्ट २०२० रोजी आरोपी अतुल केशव उर्फ किरण मालेकर (१९) रा. गडचांदुर वार्ड क्र.०६ यास कलम ३७६ भादंवि मध्ये दोषी करार देवुन कलम ४ पोक्सो मध्ये ७ वर्ष कारावासाची शिक्षा आणि ५,०००/-रू दंड, दंड न भरल्यास ०१ वर्ष कारावासाची शिक्षा, कलम ६ पोक्सो मध्ये १० वर्ष कारावासाची शिक्षा व ५,०००/-रू दंड, न भरल्यास ०१ वर्ष शिक्षा मा. जिल्हा न्यायाधीश २ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश वि.द.केदार सर, चंद्रपुर यांनी ठोठावली आहे. सदर प्रकरणामध्ये सरकार तर्फे अॅड. ए.एस. शेख, सरकारी अभियोक्ता, चंद्रपूर आणि कोर्ट पैरवी म्हणुन स.फौ. विलास वासाडे, पोलीस स्टेशन गडचांदुर यांनी काम पाहिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies