चंद्रपूर जिल्ह्यातील पहिला कोरोना चा बळी
चंद्रपूर 1 ऑगस्ट - शनिवारी दुपारी स्थानिक रहमतनगर येथील एका ४२ वर्षीय व्यक्तीचा करोनाने मृत्यू झाला असून तो चंद्रपूर जिल्ह्यातील पहिला कोव्हीड-१९ चा बळी ठरला आहे. सदर व्यक्तीला गुरुवारी रात्री चिंताजनक स्थितीत कोव्हीड हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. त्याचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला आहे. करोनाने मृत्यु झालेला व्यक्ती हा पत्नीच्या बाळंतपणामुळे अमरावती येथे १५ दिवस होता. तो चंद्रपुरात परतल्यावर त्याला ताप आला. श्वास घेण्यास त्रास होत होता. कोव्हीड-१९ ची लक्षणे आढळल्याने त्याला चिंताजनक स्थितीत गुरुवारी कोव्हीड हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. त्याचा स्वॅब घेण्यात आला होता. पण उपचारादरम्यान त्या व्यक्तीचा मृत्यू झाला असून त्याचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी दिली.

Post a comment

0 Comments