चंद्रपूर जिल्हा कारागृहात 1 पोलीस कर्मचारी सह तब्बल 71 कैद्यांना कोरोनाची लागणचंद्रपूर – जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता चंद्रपूर शहरात ३ सप्टेंबर पासून कडक लॉकडाउन करण्यात येणार आहे हा लॉकडाऊन १ आठ्वड्यापर्यंत असणार आहे.
कोरोनामुळे मोहर्रम निमित्त चंद्रपूर जिल्हा कारागृहात दरवर्षी गैबी शाह वली यांच्या पवित्र दर्गाह चे हजारो नागरिक दर्शन करण्यासाठी येत असतात.


परंतु कोरोनामुळे यावेळचा उर्स रद्द करण्यात आला आहे.
28 ऑगस्टला चंद्रपूर जिल्ह्यात १७८ कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली, आता तर हा कोरोना विषाणू जिल्हा कारागृहात शिरला आहे . आरोग्य विभागातर्फे मिळालेल्या माहितीनुसार कारागृहातील १ पोलीस कर्मचारी सह तब्बल ७१ बंदिस्ताना कोरोनाची लागण झाली आहे.
उर्वरित बंदिस्त बांधवांची कोरोना चाचणी करण्यात येत असून अहवाल आल्यावर नेमकी परिस्थिती काय आहे ते समोर येणार.

या कारागृहात एकूण 600 कैदी शिक्षा भोगत आहे.

जिल्हा कारागृह हे शहरातील मध्यवर्ती भागात आहे, चारही बाजूने हा कारागृह सुरक्षित असताना सुद्धा कोरोनाचा शिरकाव झाला.

Post a comment

0 Comments