Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

धुळे जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांसोबत झालेल्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ चंद्रपूर जिल्हा युवा मोर्चा आक्रमक

आज दि.27/08/2020 ला माजी अर्थमंत्री आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार व श्री.देवरावजी भोंगळे (चंद्रपूर भाजपा जिल्हाध्यक्ष ग्रामीण) यांच्या मार्गदर्शनात भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला धुळे जिल्ह्यामध्ये पालकमंत्री मा. अब्दुल सत्तार यांना विद्यार्थ्यांच्या अडचणी बाबत निवेदन देण्यासाठी ए.बी.वी.पी.चे कार्यकर्ते गेले असता कार्यकर्त्यांचा विषय समजून न घेता पालकमंत्र्यांनी लाठीचार्ज चा आदेश दिला व अमानुष मारहाण केली या विषयाचे निषेधार्थ चंद्रपूर जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चा च्या माध्यमातून तीव्र निषेध करण्यात आला एकीकडे कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर विफल झालेली महाराष्ट्राची तिघाडी सरकार ही जनतेला त्यांच्या हक्कापासून वंचित करीत आहे त्याचबरोबर आता विद्यार्थ्यांवर दडपशाही पद्धतीने आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे हे कृत्य म्हणजे संविधानाच्या नियमाची पायमल्ली आहे त्यामुळे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण व महानगर यांच्या माध्यमातून श्री.मंगेशजी गुलवाडे (भाजपा चंद्रपूर महानगर जिल्हाध्यक्ष), श्री.ब्रिजभूषनजी पाझारे (भाजयुमो जिल्हाध्यक्ष ग्रामीण) तसेच श्री.विशालजी निंबाळकर (भाजयुमो महानगर जिल्हाध्यक्ष)यांच्या नेतृत्वात तसेच श्री.आशिषजी देवतळे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये महाराष्ट्र सरकारच्या चुकीच्या धोरणांचा निषेध करण्यात आला व जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन देण्यात आले या प्रसंगी सुरज पेदुलवार, प्रज्वल कडू, यश बांगडे, स्नेहित लांजेवार, कुणाल गुंडावार, शुभम सुलभेवार,राहुल लांजेवार, राहुल पाल, प्रमोद शिरसागर, त्याचबरोबर अनेक भाजयुमो पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.Post a comment

0 Comments